vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे आज वितरण

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे आज वितरण..

 

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘ मूकनायक ‘ या पाक्षिकामागील सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्यासाठी मराठवाड्यातील ‘शाक्यमुनि प्रतिष्ठानने यंदा राज्यस्तरीय ‘मूकनायक पुरस्कार ‘ सुरू केला आहे. पहिल्या वर्षातील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोका हॉल येथे आयोजित कार्यक्रमात दिवाकर शेजवळ यांना राज्यस्तरीय ‘मूकनायक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. समारंभाला वडाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे प्राचार्य ॲड. जयमंगल धनराज, ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, पी.ई.एस.अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, पत्रकार विजय बहादुरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार संमारंभास मराठवाड्यातील बहुजन चळवळीतील विद्यार्थी, युवक-युवती, कर्मचारी,व कार्यकरत्यांनी बहुसंखेने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘शाक्यमुनि प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष प्रा. शरद वंजारे, उपाध्यक्ष प्रा.दिपक जमधाडे आणि सचिव प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

पाणी हक्क समितीच्यावतीने ‘सर्वासाठी पाणी ‘अहवाल सादर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली.

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta

चला जाणूया वनाला’ निसर्ग पर्यटन योजना*‍*मुलांना मिळणार वनांची माहिती*

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार*राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती

वर्षा अखेर दुर्दैवी घटना मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले

vishwatmaklokswamivarta