vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईच्या मस्जिद बंदर येथे इमारतीला आग; धुरामुळे 2 जणांचा मृत्यू

मुंबईच्या मस्जिद बंदर येथे इमारतीला आग; धुरामुळे 2 जणांचा मृत्यू घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या बचाव कार्यासाठी पोहोचल्या

 

मुंबई प्रतिनिधी- मुंबईतील मस्जिद बंदर येथील राम मंदिराजवळील वडगडी येथील इस्साजी स्ट्रीटवर असलेल्या पन्न अली मॅन्शन या 12 मजली निवासी इमारतीत आज सकाळी आग लागली. मुंबई अग्निशमन दलाला (MFB) सकाळी 6.11 वाजता आगीची माहिती मिळाली व त्यानंतर आपत्कालीन मदत करणारे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आगीवर नियंत्रण मिळवलेले आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की सदर ठिकाणी आगीची माहिती मिळताच व त्यानंतर आपत्कालीन मदत करणारे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. ही आग ग्राउंड फ्लोअरवरील कॉमन मीटर बॉक्स आणि पॅसेजमधील इलेक्ट्रिक वायरिंग आणि इन्स्टॉलेशन्सपर्यंत मर्यादित होती. आग तातडीने विझवण्यात आली असली तरी, इमारतीत प्रचंड धूर पसरला होता व त्यामुळे अनेक रहिवाशांना गुदमरल्यासारखे वाटले. दुर्दैवाने, धुरामुळे दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. जेजे रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. याज्ञिक यांनी साजिया आलम शेख (30) आणि सबिला खातून शेख (42) यांच्या मृत्यूची पुष्टी केली. जखमींपैकी तीन रहिवाशांना धुरामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु प्राथमिक अहवालात मीटर बॉक्समध्ये विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याचे सूचित केले आहे. अधिकाऱ्यांनी इमारतीच्या सुरक्षा अनुपालनाची चौकशी सुरू केली आहे

 

संबंधित पोस्ट

जलवितरण व्यवस्थेत ऑटोमायझेशनसाठी सिडकोला टेंडर प्रक्रियेचे आदेश- उद्योग मंत्री उदय सामंत

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ ॲप डाऊनलोड करुन नोंदणी करावी- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांची पेट्रोल पंपांवर अचानक भेट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन,थेट पंपांवर जाऊन केली इंधन साठ्याची प्रत्यक्ष तपासणी !साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा !