vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील “छावा” चित्रपट पाहून प्रेक्षक हळहळले …बॉक्स ऑफिसवरही केली धम्माल कमाई.

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील” छावा” चित्रपट पाहून प्रेक्षक हळहळले …बॉक्स ऑफिसवरही केली धम्माल कमाई.

 

बॉलीवूड प्रतिनिधी -बॉलीवूड अभिनेता विकी कौशल यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपट पाहून प्रेक्षक हळहळले …बॉक्स ऑफिसवरही केली छप्पर फाड कमाई…बहुचर्चित ‘छावा’ हा चित्रपट काल १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा शेवटचा सीन मात्र प्रेक्षकांना भावूक करून जाणारा ठरला आहे. अगदी प्रेक्षकांच्या डोळ्यात घळाघळा अश्रू दाटून आलेले पाहायला मिळाले. छावा चित्रपट प्रदर्शित होणार त्याआधीच प्रिबुकिंग करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल ३१ कोटींची कमाई केली आहे. तर

आज १५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या शोपर्यंत चित्रपटाने ७.६१ कोटींची कमाई केलेली पाहायला मिळाली. दुपारी आणि संध्याकाळच्या शोचे बुकिंग झाल्यानंतर हा कमाईचा आकडा आणखी वाढणार आहे. त्यामुळे आतापर्यंत चित्रपटाने ३८.६१ कोटींचा गल्ला बॉक्सऑफिसवर जमवला आहे.

शनिवार आणि आज  रविवार या २ दिवसात चित्रपट आणखी कमाई करणार असा विश्वास आहे. छावा चित्रपटाला मुंबई, पुण्यासह चेन्नई, हैद्राबाद आणि जयपूर मधूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. छावा देशभरात पोहोचावा आपल्या राजाचा इतिहास लोकांना समजावा हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात वाहणारे अश्रू त्याची साक्ष देत आहेत.

“छत्रपती संभाजी महाराज” हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो एक भावनिक आणि ऐतिहासिक अनुभव आहे. पहिल्या दिवसाचा तिसरा शो पाहताना तो सिनेमा नाही, तर साक्षात इतिहास जिवंत होत आहे, असेच जाणवत होते.

चित्रपट सुरू झाल्यापासून विकी कौशल फक्त एक अभिनेता वाटत नाही, तर तो संभाजी महाराजच भासतो.

त्याची देहबोली, चेहऱ्यावरचा करारी भाव, डोळ्यातील रोष आणि रणभूमीतील स्वाभिमान – प्रत्येक क्षणी तो संभाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर उभं करतो.

युद्धाच्या प्रसंगात तलवारीचा चमकणारा वार, सिंहासारखी गरज, आणि शत्रूच्या डोळ्यात भीती निर्माण करणारी नजर – हे सगळं पाहताना अंगावर शहारा येतो.

काही प्रसंग इतके प्रभावी आहेत की अश्रूंना वाट करून देणं अशक्य होऊन जातं.

हा फक्त सिनेमा नाही, ही तीव्र अनुभूती आहे!चित्रपट संपल्यानंतरही मनातून बाहेर न पडणारा अनुभव म्हणजे “छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट. या सिनेमानंतर विकी कौशलच्या रूपातच संभाजी महाराज दिसतील, हे निश्चित!

साभार – परेश पाटील

संबंधित पोस्ट

भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ या कॉमेडी चित्रपटातील गाणे रिलीज..

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी  बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई…

दूरदर्शनचा प्रेक्षकांच्या भेटीला मालिकांचा अनमोल नजराणा…

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…

पंजाबच्या जालंधरची कुमारी रॅचेल गुप्ता मिस ग्रँड इंटरनॅशनल मुकुट जिंकणारी पहिली भारतीय…

vishwatmaklokswamivarta