vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवजयंतीनिमित्त ‘जय शिवाजी-जय भारत यात्रा’ उत्साहात;मान्यवरांचा सहभाग..

शिवजयंतीनिमित्त ‘जय शिवाजी-जय भारत यात्रा’ उत्साहात;मान्यवरांचा सहभाग..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी- जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. विविध मान्यवर, नागरिक, विद्यार्थी या यात्रेत उत्साहात सहभागी झाले. पारंपारिक वेशभूषा व साहसी खेळांच्या सादरीकरणाने लक्ष वेधून घेतले.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांतीचौक येथील पुतळ्याजवळ सकाळी साडेसात वाजता इतर मागास बहुजन कल्याण तथा दुग्धविकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करुन यात्रेस सुरुवात करण्यात आली. ढोल पथक, लेझीमच्या तालावर यात्रेची सुरुवात झाली. तलवारबाजी, सायकलींग, स्केटिंग, मल्लखांब, जिमनॅस्टिक, योगासन, पोवाडा, पाळणागीत इ. सादरीकरण यात्रेत करण्यात येत होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. क्रीडा ज्योतही मान्यवरांच्या हस्ते नेण्यातआली. पैठण गेट, गुलमंडी मार्गे या पदयात्रेचा समारोप औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ करण्यात आला.

०००००

संबंधित पोस्ट

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढइयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडकअंमलबजावणीसाठीसोनोग्राफी, एमटीपी केंद्रांची वेळोवेळी तपासणी करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

जालन्यातील “त्या ” तिन्ही योजनांच्या सवेक्षणासाठी चार सदस्यीय पथक मंगळवारी जालन्यात—मा.आ. कैलास गोरंटयाल यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

vishwatmaklokswamivarta

स्वित्झर्लंडमधील ‘दावोस’मध्ये गोव्याच्या ‘दैवी कणां’ची भुरळ; विज्ञानाला न उलगडणारे कोडे जागतिक पटलावर

व्यसन दुष्परिणामाबाबत प्रत्येक शाळेत20 फेब्रुवारी, 11 मार्चला परिपाठ – जिल्हाधिकारी अशोक काकडे- व्यसन दुष्परिणाम परिपाठामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- व्यसनमुक्तीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन- तंबाखूजन्य व प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी दक्ष राहा…

vishwatmaklokswamivarta