vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

कल्याण मध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू ,जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय…

कल्याण मध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू ,जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय…

 

 राज्य प्रतिनिधी-

कल्याणच्या काटेमनोली नाका येथील नाना पावशे चौकात बुधवारी मध्यरात्री साधारण 12:30 वाजता गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात रंजीत दुबे नामक व्यक्तीची हत्या करण्यात आली. आरोपी रामसागर दुबे हा मृतकाचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे.

जमिनीच्या वादातून हत्या,पोलीस तपासानुसार, दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. त्याच कारणावरून रामसागरने रंजीतवर आधी गोळी झाडली आणि नंतर चाकूने वार करत त्याची हत्या केली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई केली,

घटनास्थळावरून पोलीस तातडीने सक्रिय झाले आणि काही वेळेतच आरोपी रामसागरला अटक करण्यात आली. मृतकाच्या बहिणी पूनम तिवारीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्या आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

रंजीत दुबेचा गुन्हेगारी इतिहास।सूत्रांच्या माहितीनुसार, रंजीत दुबे हा रवि पुजारी टोळीचा शूटर होता. यापूर्वी मुंबई क्राईम ब्रँचनं एका बिल्डरवर गोळीबार केल्याच्या प्रकरणात त्याला अटक केली होती.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण।

या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ही हत्या पूर्वनियोजित होती की वादातून अचानक घडली, याचा शोध घेतला जात आहे.

संबंधित पोस्ट

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त-ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकविद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस,सीसीटीव्ही कॅमेरे,पॅनिक बटन सुविधा बंधनकारक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नक्शा’ पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ ड्रोन सर्वेक्षण होणारØ जमिनींचे ३डी नकाशे, मिळकत पत्रिका तयार होणार जागेची सीमा निश्चित होण्यास मदत..

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील मोदीज् मिशन’ या सुप्रसिद्ध वकील बर्जिस देसाई लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्या राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार. 

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,कठोर नियंत्रण, झूम वेबकास्ट व ड्रोन चित्रीकरणामुळे प्रशासनाचे यश पुढील सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस