vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी दादर येथे मूक निदर्शने..

बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी दादर येथे मूक निदर्शने..

  मुंबई प्रतिनिधी – ‘बांगलादेशी घुसखोर हाकला, देश वाचवा’ ही मोहीम हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हाती घेतली असून या दृष्टिने दादर (प.) रेल्वे स्थानकाबाहेर २० फेब्रुवारी या दिवशी बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

   मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्हा यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तसेच देशभरात बांगलादेशी घुसखोर मोठ्या संख्येने बेकायदेशीरपणे राहत आहेत. यामुळे देश आणि राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ, रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बांगलादेशी घुसखोर देशातून हद्दपार करा, बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. संशयित ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून, बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा, आदी मागण्या या मूकनिदर्शनात करण्यात आल्या. याविषयीचे फलक निदर्शनात सहभागी झालेल्यांनी यावेळी हातात घेतले होते. प्रशासनाला यासंदर्भातील करण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा घेण्यात आल्या, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बांगलादेशी घुसखोर हाकला, देश वाचवा !’ या मोहीमेत सर्व जागरूक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.डॉ. उदय धुरीप्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती.

00000000

संबंधित पोस्ट

रमजान ईदनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा प्रेम, आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया

इंधन तुटवड्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल 

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोलवड येथे कृषी ड्रोन प्रात्यक्षिक जनजागृती शिबिर

vishwatmaklokswamivarta

गावकर्‍यांचा संताप उसळला; भ्रष्टाचारग्रस्त मुख्याध्यापक चाऊस यांच्या बडतर्फीची मागणी; उपोषणाचा ईशारा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीचे गावकर्‍यांकडून कौतुक; शिक्षक संघटनांच्या दबाव तंत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत 23 ते 25 मार्च रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन