vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

 

     खेळ प्रतिनिधी-बुलढाणा: फुटबॉल खेळाची शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी प्रथमच जिल्हास्तरीय युथ फुटबॉल लिग स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा व फुटबॉल क्लबमधील 16 वर्ष वयोगटातील खेळाडूंनी 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर यांनी केले आहे.

फुटबॉल या खेळाचा प्रचार व प्रसार समाजातील प्रत्येक खेळाडूंपर्यंत व्हावा यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युथ फुटबॉल लिग सन 2024-25 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हातील सर्व शाळेतील 16 वर्ष वयोगटातील खेळाडुंना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील विविध शाळेतील संघाची नोंदणी जिल्हा क्रीडा कार्यालय बुलढाणा येथे ऑफलाईन विनामूल्य नोंदणी करून संघाची यादी दि. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यालयात जमा करून प्रवेश निश्चित करावा. सदर स्पर्धेसाठी खेळाडुंची वयोमर्यादा 1 जानेवारी 2009 नंतरचा जन्म झालेला खेळाडु स्पर्धेकरीता पात्र राहील. स्पर्धेची तारीख नंतर कळविण्यात येईल

फुटबॉल युथ लिग स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे किंवा एन.आर.वानखडे (9960434487), डॉ. जे. डब्ल्यु मोहोड(9405734403), मुकेश बाफणा (9422881105), एस.एस.केळे(9423446516) यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाव्दारे कळविण्यात आली आहे.000000

संबंधित पोस्ट

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*

मिशन लक्षवेध अंतर्गत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

नवी मुंबई महापालिका शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी खाजगी अकादमींनी 6 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत  प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन