vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 58 उमेदवारांची निवड

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 58 उमेदवारांची निवड

 

जालना, प्रतिनिधी :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवार दि.25 फेब्रुवारी 2025 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात 58 उमेदवारांची निवड करण्यात आली.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उदघाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर होते तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उपप्राचार्य रजनी शेळके, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्यात मुलाखतीतून उमेदवारांची विविध पदासाठी प्राथमिक निवड केली. यात नवभारत फर्टिलायझर्स एल.एल.पी. छत्रपती संभाजीनगर 14, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी प्रा. लि. मुंबई 10, परिनिका न्युरोकेअर हॉस्पीटल 10, एस.बी.आय. लाईफ इन्शूरन्स 13 , ओम साई राम स्टील अलॉइज 10 , टी.के. प्रिसीजन प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर 1, अशा एकुण 58 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. याठिकाणी आणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय जालनामार्फत तीन लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वयंरोजगार करण्यास इच्छूक उमेदवारकरिता शासनाचे विविध महामंडळाचे स्टॉल उभारून लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. मेळाव्यात सूत्रसंचालन डॉ. अमोल परिहार यांनी केले तर आभार सुरेश बहुरे यांनी मानले. मेळाव्यासाठी कौशल्य विकास रोजगार विभागाचे कौशल्य विकास अधिकारी भुजंग रिठे, अमोल बोरकर, प्रदीप डोळे, रविंद्र पाडमुख, सुभाष पंडित, विशाल जगरवाल, दिनेश उढाण, सोमेश्वर शिंदे, शालिकराम वाघ आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक एस.एस.कापसे, एस.जी.चव्हाण तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध; रासायनिक खतांचा तुटवडा नाही तक्रारींसाठी तालुका, जिल्हास्तरीय कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा

एन.डी.ए.,सी.डी.एस.परीक्षा 13 एप्रिल रोजी4447 उमेदवारांची बैठक व्यवस्था..

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरती-दि.१ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

विभागीय हातमाग कापड स्पर्धाचे आयोजन* 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणीकांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

vishwatmaklokswamivarta

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta