vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्षॲड. धर्मपाल मेश्राम यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट..

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्षॲड. धर्मपाल मेश्राम यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट..

जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी जालना येथील रमाबाई नगरातील हत्या झालेल्या मोनिका झांबरे-निर्मळ यांच्या कुटुंबियांची भेट घेत आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रदीप भोगले, पोलिस उपअधिक्षक दिलीप भागवत, पोलिस निरीक्षक एस.के.माने, ज्ञानदेव नागरे, दिनकर घेवांदे यांच्यासह पीडितेच्या कुटुंबियांची उपस्थिती होती.

मयत मोनिका यांच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत मुलीची नोकरी, वैवाहिक जीवन, शैक्षणिक तसेच आर्थिक पार्श्वभूमी जाणून घेतली. मयत मोनिका या छत्रपती संभाजीनगर येथे परिचारिका म्हणून काम करत होत्या. तसेच त्या अनुसूचित जातीमधील असल्याने त्यांना शासकीय मदत देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी मयत मुलीच्या आई-वडिलांसह कुटुंबियांनी यावेळी या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करत न्याय देण्याची विनंती केली. यावर ॲड. मेश्राम यांनी शासनस्तरावरुन सर्वोतोपरी मदतीसह तपासाला सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले

00.0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजना 100 टक्के उद्दिष्टपूर्ती*

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार: ‘भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करा’– आमदार टी. राजा सिंह यांचे प्रतिपादन१६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत अकोल्याचे ‘एकवीरा मैदान’ चैतन्यमय;संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा..

vishwatmaklokswamivarta

क्षेत्रपाल धनगरवाडीतील 26 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य दरड कोसळल्यानंतर तातडीची कार्यवाही; वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ•उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

vishwatmaklokswamivarta