vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

एन.डी.आर.एफ. मार्फत ३ मार्चपासून जनजागृती, प्रशिक्षण

 एन.डी.आर.एफ. मार्फत ३ मार्चपासून जनजागृती, प्रशिक्षण

 

सांगली, प्रतिनिधी-

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने सांगली जिल्ह्यात दि. ३ ते १० मार्च या कालावधीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रशिक्षणाचा तपशील व ठिकाण पुढीलप्रमाणे. दि. 3 मार्च रोजी जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे व दि. 4 मार्च रोजी पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे आपत्तीची तोंडओळख, शालेय सुरक्षा, शोध व सुटका प्रथमोपचार. दि. 5 मार्च रोजी कृष्णा व्हॅली सभागृह, कुपवाड येथे औद्योगिक अपघाताच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना प्रशिक्षण. दि. 6 मार्च रोजी शिराळा तालुका स्तरावर व दि. 7 मार्च रोजी वाळवा तालुका स्तरावर आपत्तीची तोंडओळख, शोध व सुटका, प्रथमोपचार पध्दती, बोट इ.बाबतची माहिती इत्यादी. दि. 8 मार्च रोजी आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी आष्टा येथे आपत्तीची तोंड ओळख, शोध व सुटका, प्रथमोपचार पध्दती. दि. 10 मार्च रोजी मिरज तालुकास्तरावर आपत्तीची तोंडओळख, शोध व सुटका, प्रथमोपचार पध्दती, बोट बाबतची माहिती इत्यादी.

संबंधित शालेय व महाविद्यालयाच्या ठिकाणी शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी, औद्योगिक अपघाताच्या अनुषंगाने प्रशिक्षणासाठी औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अधिकारी तर शिराळा, वाळवा व मिरज तालुका स्तरावरील प्रशिक्षणासाठी नदी काठावरील/दरडप्रवण गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, नावाडी, आरोग्य सेवक, पाटबंधारे खात्यातील कर्मचारी, पशुवैद्यकीय कर्मचारी, होमगार्ड, बांधकाम विभाग कर्मचारी, रेशन दुकानदार, एन.एस.एस./ एन.सी.सी. विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, गावातील तरूण मंडळ प्रतिनिधी, आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, वीज वितरण कर्मचारी आदि प्रशिक्षणार्थी घटक असणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

तळा नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवात भर घालणारी ठरेल    — उपमुख्यमंत्री अजित पवार

आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार – डॉ हर्षदीप कांबळे चवदार तळे सत्याग्रह दिन बार्टीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे केला साजरा

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta