vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे कार्यशाळा संपन्न; तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन

बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे कार्यशाळा संपन्न; तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन

 

बुलढाणा, प्रतिनिधी : बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे दि. २७ फेब्रुवारी रोजी “आरोग्य आणि पोषण सुरक्षेसाठी वनस्पती अनुवंशिक संसाधनांचे संरक्षण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विषय तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन केंद्र नवी दिल्ली आणि कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. ज्ञानेन्द्र प्रताप सिंग, संचालक, भा.कृ.अप.- राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन केंद्र, नवी दिल्ली, डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, डॉ. एस. के. कौशिक, प्रमुख शास्त्रज्ञ तथा नोडल अधिकारी (एस. सी. एस.पी.),डॉ. कविता गुप्ता, डॉ. सुशील पांडेय, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन केंद्र, नवी दिल्ली, डॉ. सुनील गोमाशे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन केंद्र अकोला तसेच डॉ. प्रमोद वाकळे, सहयोगी अधिष्ठाता, भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषि महाविद्यालय, बुलढाणा, डॉ. सतीश जाधव, प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, बुलढाणा आदी मान्यवर उपस्थित होते.
 राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन केंद्राचे संचालक डॉ. ज्ञानेन्द्र प्रताप सिंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्याकडे असलेल्या पारंपरिक बियाण्यांचे जतन करून पूर्वजांनी ठेवलेला बियाणे वारसा जतन करावा, असे आवाहन केले. असे केल्यास आपण अन्नधान्याच्या बाबतीत प्रगती साधू शकतो तसेच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पारंपारिक बियाण्यांचा वापर करून नाविन्यपूर्ण व दर्जेदार वाणांची निर्मिती आपल्याला करता येऊ शकते असे सांगितले. यावेळी आपण सर्व सहभागी शेतकरी पारंपारिक बियाण्यांचे जतन कराल व पारंपारिक बियाणे जतनाचा संदेश इतर शेतकर्‍यांना द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली.
 डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या विकासासाठी हा एक चांगला उपक्रम आहे असे सांगून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला हे संशोधनामध्ये अग्रेसर असून मोठ्या प्रमाणावर नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. त्याचा वापर करून आपली प्रगती साधावी आणि आपले उत्पन्न वाढवून अर्थकारण बळकट करावे असे आवाहन केले. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा या कार्यालयामध्ये सतत संपर्क ठेवून येथे उपलब्ध असलेल्या विषय तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे. शेती करत असताना शेतीसोबत विविध जोडधंद्याचा समावेश करावा आणि केंद्राचे सतत मार्गदर्शन घ्यावे. जेणेकरून आपल्या जीवनमानामध्ये चांगला बदल येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या मागची भूमिका स्पष्ट करत असताना पारंपारिक बियाणे लुप्त होत आहे आणि त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहून चालणार नाही. संवर्धन, लागवड, आहारात आणणे आणि विक्री अशा चतुःसूत्री कार्यक्रमाची गरज आहे आणि हे करत असताना संशोधन आणि लोक सहभागाची भूमिका महत्वाची आहे. जागतिक अन्न संघटनेच्या अभ्यासानुसार, जगभरातील विविध पिकांमधली जैवविविधता सुमारे ७५ टक्क्यांनी संपुष्टात आली आहे आहे. जगभरात आढळणाऱ्या सुमारे ३.९ लाख वनस्पती प्रजातींपैकी फक्त ३० प्रजाती आज जगाला मुख्यत्वेकरू अन्न पुरवतात. मात्र, आता वातावरण बदल आणि पोषण समृद्धीसाठी पारंपारिक बियाणे संवर्धन भविष्य काळाची पिके म्हणून संबोधले आहे. डॉ. एस. के. कौशिक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करून असे कार्यक्रम पूर्ण भारतभर घेत असल्याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुसूचित जाती मधील लोकांना एस.सी. एस.पी. कार्यक्रमांतर्गत विविध गोष्टींचा लाभ दिला जातो आणि या मिळालेल्या लाभांमधून त्यांनी स्वतःची प्रगती साधावी असे आवाहन केले.  कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुकेशनी वाणे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील गोमाशे यांनी केले. तसेच डॉ. जगदीश वाडकर, डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. प्रवीण देशपांडे, शिवाजी पिसे, नितीन काटे, कोकिळा भोपळे, रणजीत सदार, नयनसिंग चव्हाण, नंदकिशोर ढोरे, मंगेश देवकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. 0000000

संबंधित पोस्ट

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाची सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी- 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप..

आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित..

vishwatmaklokswamivarta

सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी १३५६ कोटीचा मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले