vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

परिवहन भवनचे आज 2 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती..

परिवहन भवनचे आज 2 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती..

मुंबई, प्रतिनिधी : विभागाचे मुख्यालय असलेल्या ” परिवहन भवन ” या नव्या इमारतीचे भूमिपूजन 2 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

    रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी 1 मार्च 1940 ला तत्कालीन मुंबई राज्याचा परिवहन विभाग अस्तित्वात आला. त्यामुळे 1 मार्च हा दिवस “परिवहन दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची औचित्य साधून या रविवारी सर पोचखानवाला मार्ग वरळी, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांहस्ते 4 मजली प्रशस्त अशा “परिवहन भवन” या इमारतीचे भूमिपूजन होत आहे. सुमारे 12,800 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एकावेळी 150 चारचाकी वाहने उभी करता येतील, इतकी चार मजल्याची भूमिगत पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण केली जाणार आहे. विशेष म्हणजे राज्याला दरवर्षी 15 हजार कोटी रुपये महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाच्या मुख्यालयाला स्वतःची इमारत नव्हती. परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल गेली 85 वर्ष या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाच्या पहिल्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या मुख्यालयाची स्वतःची इमारत बांधण्याचा संकल्प सोडला. एवढंच नाही तर त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते “परिवहन भवन” या परिवहन विभागाच्या मुख्यालयाचे येत्या रविवारी भुमिपुजन होत आहे.

00000

संबंधित पोस्ट

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या सर्वसमावेशक सबलीकरणासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत- राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर- पीसीपीएनडीटी अंतर्गत धाडसत्र सुरू करा- बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करा- महिलांसाठी आवश्यक सोयी सुविधा द्या

vishwatmaklokswamivarta

महाडच्या हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी !हुतात्मा कमलाकर दांडेकर यांच्या नावाने स्मारक ओळखले जाणार; महाडच्या हुतात्मा दिनाचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी कॅबिनेटमध्ये विषय मांडणार : पालकमंत्री भरतशेठ गोगावले

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक #एसटी बससेवेचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta