vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चवदार तळ्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता,कार्यक्रम दिमाखदार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना…

चवदार तळ्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता,कार्यक्रम दिमाखदार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना…

#चवदारतळे

रायगड प्रतिनिधी- ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा 98 वा वर्धापन दि.20 मार्चला महाड येथे साजरा होत आहे. तसेच मोठया संख्येने अनुयायी येतात. हे लक्षात घेता आरोग्य, पाणी, स्वच्छतागृह यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागानी नियोजन करावे. तसेच या सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. महाड चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने

 सर्व शासकीय यंत्रणाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला. चवदार तळ्याचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेता कार्यक्रमाचे नियोजन दर्जेदार व उत्कृष्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) रविंद्र शेळके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले,तहसीलदार महाड महेश शितोळे, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी

नगरपरिषदेमार्फत चवदार तळे, भीमनगर, क्रांती स्‍तंभ, स्‍मारक परिसराची साफसफाई करण्यात यावी तसेच शहरातील विविध ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करावे. तसेच क्रांती स्‍तंभ परिसरात 100 मोबाईल शौचालये, स्नानगृहे उभारण्यात यावेतअशा सूचना दिल्या. तसेच महाड ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत रुग्णवाहिका तसेच पुरेसा औषध साठा व आरोग्य पथक तैनात राहील याची दक्षता घ्यावी. याबरोबरच अखंडित वीजपुरवठा तर अनुयायींची वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी दिल्या.

या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही खबरदारी पोलीस यंत्रणेने घ्यावी.वाहतुकीचे नियोजन करावे. तसेच शासकीय मानवंदना देण्यात यावी. एसटी महामंडळाच्या वतीने 19 ते 21 मार्च या कालावधीत माणगाव, वीर, वामने व करंजाडी रेल्वे स्‍थानक ते महाड शहर अशी जादा बस व्यवस्था केली जाणार आहे. या नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच या ठिकाणी येणाऱ्या अनुयायी यांना पिण्याचे पाणी, सावली साठी मंडप तसेच संपूर्ण परिसरात दिशा दर्शक फलक लावण्यात यावेत. अनुयायी यांना देण्यात येणाऱ्या अल्पोपाहाराची दर्जा राखावा तसेच देण्यात येणाऱ्या फूड पॅकेटची तपासणी करावी,

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईत बस, रेल्वे कडून विशेष सोय; पहा खास सोयी-सुविधा

vishwatmaklokswamivarta

नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नाशिक ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करा• रिंग रोड प्रकल्पातील रस्तेकामांचा आराखडा 10 दिवसांत पाठवा..

जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त 350 गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

देशाच्या स्वातंत्र्यदिना बरोबर निरंकारी मिशनने साजरे केलेआत्मिक जागृतीचे पावन पर्व : मुक्ती पर्व भक्तीमध्ये स्वातंत्र्याची मुक्ती- निरंकारी राजपिता रमितजी

धरण उशाला आणि घसा मात्र कोरडा.!*

हर्सूल येथील रेहान खान यांनी इंटरनॅशनल कराटे स्पर्धा मध्ये श्रीलंका चे खेळाडूंना मात देऊन प्रथम क्रमांक पटकावला