vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा,जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा,जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

जालना – प्रतिनिधी-

राज्य सरकारच्या निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने, तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतकरी, महिला, युवक आणि नागरिकांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. हा मोर्चा डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नुतन वसाहत येथून प्रारंभ होऊन अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मागण्या,शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष आहे. शेतकरी कर्जमाफी तातडीने जाहीर करावी, दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई निवारणासाठी प्रभावी उपाययोजना करावी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, तसेच पीक विम्याचा लाभ त्वरित मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजना तातडीने लागू करावी, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा आणि ठिबक सिंचनासह विविध कृषी अनुदान योजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

वीजपुरवठा आणि दुधाला हमीभाव यासंदर्भात ठोस मागण्या,ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी आणि थकबाकी वीजबील माफ करावे, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय, दुधाला किमान ₹40 प्रति लिटर हमीभाव मिळावा, दूध उत्पादकांना वेळेवर अनुदान मिळावे आणि पशुखाद्यावर अनुदान द्यावे, अशा मागण्यांचा समावेश होता.

महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐरणीवर,महिलांसाठी जाहीर केलेली लाडकी बहिण योजना कोणत्याही अटींशिवाय लागू करावी आणि दरमहा ₹2,100 मदत नियमित मिळावी, अशा मागण्यांसह घरकुल योजना, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच केसरी रेशन कार्डधारकांना पुन्हा रेशन मिळावे आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी, असा आग्रह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने धरला.

शासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

या आंदोलनात काँग्रेसचे नेते मा खा डॉ. कल्याण काळे, जिल्हा पक्षप्रभारी नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ कैलास गोरंट्याल आदी पदाधिकारी आणि शेतकरी, नागरिक व काँग्रेसचे सर्व विभाग सेलचे जिल्हाध्यक्ष,ता.अध्यक्ष उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करावीत, अन्यथा लवकरच अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

मोर्च्याचा वेळ व समारोपहा आंदोलन मोर्चा सोमवार, दिनांक ४ मार्च २०२५ रोजी सकाळी १२:३० वाजता सुरू झाला आणि दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.शासनाने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास शेतकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील, असे काँग्रेसने ठणकावून सांगितले.या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस ॲड राम कुराडे,कल्याणराव दळे,राम सावंत, विभाग सेल अध्यक्ष सौ नंदाताई पवार, राहुल देशमुख, बदर चाऊस, रफिक सर,शेख शमशु, शिवप्रसाद चितळकर,रघुवीर गुडे, सुरेश गवळी, ता.अध्यक्ष ञिबंकराव पाबळे, ज्ञानेश्वर शिंदे,रामप्रसाद खरात, कल्याणराव तारडे,वैभव उगले,जाकेर डावगावकर, जावेद बागवान,इब्राहिम भाई,विनोद रत्नपारखे,महावीर ढक्का,वाजीद खान पठाण, रमेश गोरक्षक,

संतोष अन्नदाते, सोपान सपकाळ यांच्यासह आघाडी विभाग व सेल चे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

With Regards,

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात मुसळधार, ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी,३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात..

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण ९८२ जणांचा विविध पुरस्काराने सन्मान महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

vishwatmaklokswamivarta

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस भूस्खलन- पर्यटक अडकले, बचाव कार्य सुरू

ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मदत आणि तक्रारींसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta