vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर येथे भारतीय जनऔषधी दिवस कार्यक्रम संपन्न

पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर येथे भारतीय जनऔषधी दिवस कार्यक्रम संपन्न

बदनापूर, प्रतिनिधी-बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट, बदनापूर व प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्यामार्गदर्शनाने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, बदनापुर येथे जनऔषधी दिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र आर. पी. रोड,जालनाच्या संचालिका राखी सर्वेश झंवर, नोडल ऑफिसर जन औषधी परियोजना शिवम पाटील, तसेच जालना येथील सहाय्यक आयुक्त जाधव यांची उपस्थिती लाभली.यावेळी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट च्या वतीने इन्स्टिटयूट ऑफफार्मसी, बदनापुरचे प्राचार्य डॉ. सुनील जायभाये यांच्या हस्ते सर्वमान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी फार्मसी महाविद्यालयातीलउपस्थित विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटपकरण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगीराज मुळे यांनी केले. प्रा. संदीपफोके यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्याण देवकत्तेतसेच सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्र घेतले.

००००फोटो ओळी….१३-बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.सुनील जायभाये यांच्या हस्ते सर्वमान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

००००००००

संबंधित पोस्ट

शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य नागरिक ‘यवतमाळ महोत्सवा’चा केंद्रबिंदू – पालकमंत्री ना. संजय राठोड ‘यवतमाळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आखाती प्रदेशातील बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने संबंधित सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले-महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले पाच नवीन न्यायाधीश; राष्ट्रपतींकडून नियुक्त्यांना मंजुरी

vishwatmaklokswamivarta

लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापरासंबंधी केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत 72 हजार घरकुल पूर्ण…

vishwatmaklokswamivarta