vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 ते 3 वाजेदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यावसाय चालकांसाठी फोस्टेक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण मोफत असून एमईएस फार्मसी कॉलेज, राम नगर मेहकर येथे होणार आहे. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग अन्न व्यवसाय चालकांनी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्रमोद पाटील यांनी केले आहे.
फोस्टेक प्रशिक्षण हा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा उपक्रम असून भारत सरकार आणि अन्न सुरक्षा आयुक्त यांचे निर्देशानुसार घेण्यात येत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, आणि केटरिंग व्यावसाय चालवण्याऱ्यांसाठी प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून केवळ अन्न सुरक्षा सुनिश्चित होत नाही, तर व्यावसायाची विश्वासार्हत आणि गुणवत्ता देखील वाढते. प्रशिक्षणाचा उद्देश अन्न सुरक्षा आणि स्वच्छता याबाबत जागरुकता निर्माण करणे व अन्न व्यावसाय चालकांना योग्य प्रशिक्षण देणे हा आहे.
फोस्टेक प्रशिक्षणामुळे अन्न सुरक्षा मानकांचे योग्य पालन करणे सोपे होते, ग्राहकांपर्यंत सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचवण्यासाठी मदत मिळते. तसेच ग्राहकांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन होत आहे, याची खात्री मिळते. स्वच्छता, अन्न हाताळणी, आणि आपात्कालीन स्थिती हाताळण्याबद्दल कर्मचारी अधिक जागरुक आणि प्रशिक्षित होतात. अन्न सुरक्षा मानकांचे पालन न केल्यास व्यवसायाला दंड किंवा परवाना रद्द होण्याचा धोका असतो. प्रशिक्षणामुळे हे धोके कमी होतात. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर सहभागी अन्न व्यवसाय चालकाना फोस्टेक प्रमाणपत्र दिले जाते.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या अधिकृत प्रशिक्षण भागीदारामार्फत प्रशिक्षण दिले जाणार असून सदर प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसायाची परवाना प्रत, व्यवसायातर्फे सहभागी होणारे मालक, शेफ, सुपरवायजर यांचे आधार कार्ड, स्वत:चा पासपोर्ट फोटो, हात गाडीचा फोटो व पॅन कार्ड ची कॉपी पॅन नसल्यास तसे शपथपत्र आणावे.
000000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांचा सकारात्मक प्रतिसाद स्थलांतरणाला पूर्ण सहकार्य करण्याचे सरपंचांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात विविध बाबींसाठी मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात कोकण प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट अपचा वापर करा अपघातप्रवण ठिकाणांची मिळणार पूर्वसूचना पनवेल आरटीओचे वाहनचालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 21824 क्युसेक्स तर वारणा धरणातून 11960 क्युसेक्स विसर्ग सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयातमहात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर तीथक्षेत्र विकासासाठी 4150.46 कोटीच्या विकास आराखड्यास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता