vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सोलापूरच्या समान पाणी वितरणासाठी आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूरच्या समान पाणी वितरणासाठी आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

राज्य प्रतिनिधी

सोलापूर शहरासाठीचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन जलवितरण प्रणाली आणि वाढीव जलसाठवण क्षमता निर्मितीसाठीचा प्रकल्प टप्पा २ तातडीने पूर्ण करण्यासाठीच्या कार्यवाहीस गती द्यावी. तसेच सोलापूरवासियांना समसमान पाणी वितरणासाठीचा आराखडा तयार करून ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना संदर्भात विधानभवन येथे बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना तातडीने पाणी मिळावे, यासाठी कार्यवाही करण्यासंदर्भात निर्देश दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरास होणारा अपुरा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि समसमान पाणी वितरण प्रणाली राबविण्यासाठी आराखडा तयार करावा. नवीन उच्चस्तरीय जलकुंभ पहिल्या टप्प्यात व १३ नवीन उच्चस्तरीय जलकुंभ बांधणे तसेच नवीन जलवाहिन्या, मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन आणि वाढीव पंपिंग क्षमता उभारण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच पाकणी येथे ६६ द.ल.ली. क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याच्या प्रकल्प कामातील भू-संपादनाची प्रक्रिया जलदगतीने करावी जेणेकरून समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

.बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के.एच.गोविंदराज, नियोजन विभागाचे अपर मुख्य डॉ. राजगोपाल देवरा, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, नगरपरिषदेचे आयुक्त मनोज रानडे उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

नवी दिल्लीत १९ मार्चपासून ‘महाराष्ट्र साडी महोत्सव’ राज्याचा विणकाम वारसा आता देशाच्या राजधानीत

हैदराबाद विमानतळावर सीआयएसएफची मोठी कारवाई …अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ₹1.4 कोटी किमतीच्या अघोषित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त — ड्रोन, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक वस्तूंचा समावेश.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून..

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘More from Less for More’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार