vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून चॅम्पियन्स चषक विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन

क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांकडून चॅम्पियन्स चषक विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन.

 

मुंबई प्रतिनिधी -आयसीसी चॅम्पियन्स चषकावर तब्बल १२ वर्षांनंतर भारताचे नाव कोरल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. भारतीय संघाने सांघिक भावना आणि जिद्द, चिकाटीतून क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी आणली आहे, हे अभिमानास्पद आहे, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्णधार रोहित शर्मा यांचे विशेष कौतुक केले आहे. या संपूर्ण मालिकेवर कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुरवातीपासून वर्चस्व राखले आणि अंतिमतः विजयाचा कळस केला. यासाठी भारतीय संघ कौतुकास आणि अभिमानास पात्र आहे. क्रिकेट हे भारतीयांचे वेड आहे. पण केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी भारतीय संघाचे चाहते आहेत. त्यांच्यासाठीही भारताच्या ‘यंग अँड एनर्जेटीक’ संघाची चिवट झुंज उत्कंठावर्धक ठरली. संघाने विजयश्री खेचून आणत क्रिकेट प्रेमींच्या आयुष्यात अवर्णनीय अशा क्षणांचे साक्षीदार होण्याची अविस्मरणीय पर्वणीच आणली. हा विजय नेत्रदीपक आणि क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता, त्यासाठी आपण सर्व क्रिकेट प्रेमी भारतीय संघाचे आभारी राहू, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक आदींचे अभिनंदन केले आहे.

०००

 

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर-दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी…..

vishwatmaklokswamivarta

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी घेणार शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील अनुपालनाचा आढावा

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

vishwatmaklokswamivarta

सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी ‘घाटी’ला ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार- पालकमंत्री संजय शिरसाट,स्मशानभुमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारांस १ कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय..

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक