vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धतेची प्रतिज्ञा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धतेची प्रतिज्ञा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा…

मुंबई, प्रतिनिधी: भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित भारतातील, विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल, असा प्रतिज्ञा घेऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, महाराष्ट्र विकासाच्या पथावर अग्रेसर आहे. या सकारात्मक वाटचालीत येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा या सणांकडून घेऊया. उत्सव साजरा करताना, पर्यावरणाचा आदर करण्याचा वसा आपल्या संस्कृतीने दिला आहे. हा वसा आपण निर्धाराने पुढे नेऊया. या उत्सवांच्या काळात वृक्ष जतन, जलसुरक्षा- जलसंवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे रक्षण आणि पर्यावरणपूरक घटकांचा वापर करूया. यातून जल- वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळूया. याशिवाय या सण-उत्सवांच्या निमित्ताने परस्पर आदर, स्नेह-भाव वृद्धिंगत व्हावा, यासाठी प्रयत्न करूया. सामाजिक-सलोखा आणि शांती-सौहार्द कायम राखण्याची आपली परंपरा आहे. ही आणखी दृढ व्हावी, यासाठी एकजूटीने आणि निर्धारपूर्वक प्रयत्न करूया. या सगळ्यातून आपला विकसित महाराष्ट्र पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध होईल, यासाठी कटिबद्ध राहूया, अशी भावना व्यक्त करून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित पोस्ट

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महानगराच्या कायापालटास गती येणार

उजनी धरणातून भीमा नदीत ६,६०० क्यूसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली-हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस..

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि केंद्रशासित प्रदेश शासन (दुरुस्ती) विधेयक २०२५ या महत्त्वपूर्ण विधेयकांवर सखोल चर्चा आणि व्यापक सल्लामसलत सुरू केल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा अपराजिता सारंगी

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती;पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट- मंत्री आदिती तटकरे.