vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषी संशोधन केंद्रास सर्व अर्थसहाय्य- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषी संशोधन केंद्रास सर्व अर्थसहाय्य- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

 

मुंबई, प्रतिनिधी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी २.८५ कोटी रुपायांचा आणि पायाभूत सुविधांचा १४.३५ कोटी रुपयांचा असे दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यात येतील, अशी माहिती कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी सदस्य अभिजीत वंजारी यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. डाळवर्गीय पिके आणि कडधान्यच्या संशोधनामध्ये बदनापूर कृषी संशोधन केंद्राचे महत्वाचे योगदान आहे. या केंद्राच्या माध्यमातून तूर, हरभरा, उडीद या पिकांची देशभरात मागणी असलेली अनेक बियाणे तयार करण्यात आली आहेत. चांगले उत्पादन देणारी ही बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे या केंद्राच्या पायाभूत सुविधांसह संशोधनासाठीही शासन अर्थसहाय्य करत आहे. या केंद्राचे दोन प्रस्ताव असून या दोन्ही प्रस्तावांना मंजुरी देऊन केंद्रास निधी दिला जाईल. तसेच या केंद्रात तयार होणारी बियाणे स्थानिक शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती कृषी मंत्री ॲड.कोकाटे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार-प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम;शाळास्तरावर दि.१५ पासून जनजागृतीसाठी विविध उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी