vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई प्रतिनिधी –

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ.राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ.कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने घणसोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोली कार्यक्षेत्रातील श्री.कुशलचंद गौर (घरमालक), एन.जी.ग्रँड प्लाझा,रुम नं.502, प्लॉट नं.09, से.11 घणसोली, नवी मुंबई यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता भोगवटा प्रमाणपत्रा व्यतिरिक्त सोसायटी अंतर्गत मोकळया स्पेसमध्ये विनापरवानगी अनधिकृतपणे वीट बांधकाम करुन पुढील बाजुस वाढीव बांधकाम करुन एक रुम तयार करुन दरवाजा काढला होता. संबधितांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम,1966 चे कलम अन्वये संबधितांना नोटीस बजावण्यात आली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.

सदरच्या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिका यांनी तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम 05 कामगार व 02 घन यांच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी / कर्मचारी, पोलिस पथक तैनात होते.यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेराज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

धारावीत भारतीय जनता पार्टी चे लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

निवासी शाळांतील विद्यार्थ्यांच्या विभागीय  स्नेहसंमेलनाचा उत्साहात शुभारंभ  

vishwatmaklokswamivarta