vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याकरिताजिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याकरिताजिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..

ठाणे, प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे व जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांच्या पुढाकारातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रचार-प्रसिद्धी विविध माध्यमांद्वारे सुरु करण्यात आली आहे.

यानुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे व जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या प्रदर्शनात माहिती फलकांद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली असून या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

त्यानुषंगाने ठाणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढील काही दिवस संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच महाविद्यालये, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

, डिजिटल वॉलद्वारे प्रसिद्धी, क्यू आर कोड, शासकीय योजना चित्रफिती व सोशल मिडीया प्रसिद्धी, व्हिडिओ क्रिएटिव्ह, जिल्ह्यातील तलावांवरील चित्रफिती, मोबाईल स्टॅन्डद्वारे प्रसिद्धी, मोबाईल व्हॅन, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची सोशल मिडियाद्वारे प्रसिद्धी अशा विविध माध्यमांद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रचार-प्रसिद्धी करण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित.

vishwatmaklokswamivarta

मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा-अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्चला

अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या-वाहनांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना-नवी मुंबई  क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तसेच शुक्रवार दि. 07 मार्च 2025 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.