vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50 टक्के सवलतीची अभय योजना जाहीर…

थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50 टक्के सवलतीची अभय योजना जाहीर…

 

      नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी देयके थकीत असलेल्या ग्राहकांकडील थकीत पाणी देयक वसुलीकरिता सर्व प्रकारच्या पाणी देयक ग्राहकांसाठी विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50% सूट / सवलत देण्याबाबतची अभय योजना दि. 21 मार्च 2025 ते दि. 31 मार्च 2025 या कालावधीकरीता लागू करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी जाहीर केले आहे.

 त्यानुसार, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे थकीत पाणी देयक ग्राहक तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील थकीत पाणी देयक ग्राहक यांना थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50% सूट / सवलत ही दि. 21 मार्च ते दि. 31 मार्च 2025 या कालावधीपर्यंत देण्यात येत आहे.

      तरी, या अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले थकीत पाणी देयक दि. 31 मार्च 2025 पर्यंत भरणा करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहनबचत ही काळाची गरज असून वेतनातील 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा

माननीय खासदार डॉ. कल्याण काळे यांची अन्नामृत फाउंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाकगृहास सदिच्छा भेट..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

गडचिरोली पॅटर्न: ‘घाटो कट्टा’च्या माध्यमातून महिला होणार आत्मनिर्भर; सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ६ फिरत्या रेस्टॉरंटचे लोकार्पण

जागृती योजनेंतर्गत मिरजेत 11 जुलैला कायदेविषयक शिबीर