vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात ३४०६ प्रकरणे निकाली28 कोटी 48 लाखाहून अधिक रक्कम वसूल..

राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात ३४०६ प्रकरणे निकाली28 कोटी 48 लाखाहून अधिक रक्कम वसूल..

 

       सांगली, प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये महालोकअदालतचे आज आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतमध्ये जिल्ह्यातील १ हजार ९३९ दावापूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. तसेच सर्व न्यायालयातील मिळून १ हजार ४६७ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ३ हजार ४०६ प्रकरणे निकाली करण्यात आली. या लोकअदालतमध्ये सांगली जिल्ह्यातून एकूण 28 कोटी 48 लाख 32 हजार 954 रूपये रक्कमेची वसूली करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये महालोकअदालतचे आज आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेवून आपला मोलाचा वेळ व पैसा वाचविण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश क्र.4 डी.वाय. गौड, तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्र. 1 श्रीमती एम. एस. काकडे, सहाय्यक जिल्हा सरकारी वकील व्ही.एम. देशपांडे, वकील बार संघटनेचे अध्यक्ष किरण रजपूत व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

      यापैकी मोटार अपघात वाहन दावे प्रकरणांतील जखमी लक्ष्मण सूर्यवंशी यास विमा कंपनी गो डिजीट इन्शुरन्स कंपनीकडून प्रकरण दाखल झाल्यापासून एक आठवड्याच्या आत 2 लाख 20 हजार रूपये रक्कम मंजूर करण्यात आली. मयत देवानंद चव्हाण यांच्या वारसांना 75 लाख रूपये रक्कम विमा कंपनी रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनी यांच्याकडून लोकअदालतमध्ये देण्याबाबत आदेश करण्यात आले. विमा कंपनीतर्फे अॅड. सचिन फाटक यांनी काम पाहिले. अर्जदार व कंपनीतर्फे काम पाहिलेले विधिज्ञ यांचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी अभिनंदन केले.   या लोकअदालतमध्ये सांगली मुख्यालय येथे पॅनेलप्रमुख म्हणून डी. वाय.गौड व एम.एस. काकडे यांनी जिल्हा न्यायाधीश पॅनेलप्रमुख म्हणून तर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. एम. राव, श्रीमती व्ही. पी. गायकवाड, श्रीमती’ एन. के. पाटील, व्ही.डी. घागी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सांगली, व्ही. व्ही. पाटील, डब्लू ए. सईद, जी. जी. चौंडे, एस. व्ही. बहिरट व ओ.एस. शास्त्री दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनी काम पाहिले. तसेच कन्सिलिएटर म्हणून अड. जे. व्ही. नवले, अड. मुक्ता दुबे, अड. मोहन कुलकर्णी, अड. विक्रांत वडेर, अड. सुनंदा पाटील, अड. अमित पाटील, ॲड. प्रशांत सोमण, ॲड. गौरी पोतदार, ॲड. एस. एम. पखाली, अड. अश्विनी झाडबुके, ॲड. अश्विनी मोहिते, डॉ. पूजा नरवाडकर सामाजिक कार्यकर्ते यांनी भाग घेतला होता

काम पाहिले.   लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गिरीजेश ग. कांबळे यांनी संपूर्ण लोकअदालतीचे नियोजन केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक नरहरी दांडेकर, प्रफुल्ल मोकशी, नितीन आंबेकर, सागर पाटील, प्रियांका शिंदे, अमोल कोळेकर, विजय माळी, गौस नदाफ उपस्थित होते. लोकअदालतच्यावेळी पक्षकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

   पुढील राष्ट्रीय लोकअदालत दि. १० मे २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार असून पक्षकारांनी यामध्ये सहभाग घेवून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली तर्फे करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेच्यालाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहान येथे भूखंडाचे वितरण

vishwatmaklokswamivarta

जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भ पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्वाचे ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉम्पेक्स-2025 प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट,नागपूर एआयचे महत्वाचे केंद्र ठरेल  राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे

vishwatmaklokswamivarta