vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कविता या स्त्रीलिंगी शब्दात मोठी ताकद : रोहिदास पोट

कविता या स्त्रीलिंगी शब्दात मोठी ताकद : रोहिदास पोट

 

अलिबाग प्रतिनिधी लोकशाही, क्रांती , तलवार, मतपेटी या स्त्रीलिंगी शब्दामध्ये मोठी ताकद आहे. त्याचप्रमाणे कविता व गजल या स्त्रीलिंगी शब्दात देखील फार ताकद असल्याचे प्रतिपादन लेखक, कवी व समीक्षक रोहिदास पोटे योनी केले.

 पेण येथील महात्मा गांधी वाचनालय येथे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रायगड व महात्मा गांधी वाचनालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सव-२०२४- या दोन दिवसा कार्यक्रमात अखेरच्या दिवशी गजल व कविता एक काव्यानुभव या परिसंवादात अध्यक्ष स्थानावरून रोहिदास पोटे बोलत होते. एल. बी. पाटील, सुभाष कटकदौंड, , विनोद टेंबूलकर, पां. शि. पाटील, वैभव धनावडे, दिलीप मोकल , जीविता पाटील यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंद‌विला सुत्रसंचलन मोहिनी गोरे यांनी केले ” मराठी वृतपत्रातील शब्दांचे सामर्थ्य’ या विषयावरील परिसंवादात कांतीलाल कडू, प्रकाश सोनवडेकर, दत्ता म्हात्रे, विजय मांडे , विजय मोकल यांनी आपले विचार व्यक्त केले.वृत्तपत्रात बातमी प्रसारित करताना योग्य शब्दांचा वापर केला पाहिजे असा सूर या परिसंवादात उमटला. वृत्तपत्रात योग्य शब्द, छोटी वाक्ये, साधी व सोपी वाक्य रचना जास्त महत्वाची असल्याचे मत प्रकाश सोनवडेकर, अलिबाग यांनी व्यक्त केले तर पत्रकारांमध्ये संवेदनशिलता असते. संवेदनशील व्यक्तीच पत्रकार म्हणून काम करू शकतो, वृत्तपत्र हा लोकशाहीचा सर्वात भक्कम व प्रभावी स्तंभ असल्याचे मत कांतीलाल कडू यांनी व्यक्त केले. समाजाला आकार , विचार व दिशा देण्याचे काम वृत्तपत्र करतात असे विजय मोकल म्हणाले. २२ वर्षे रखडलेली पाणी पुरवठा योजना वृत्तपत्रांमध्ये बातम्या देऊन पूर्ण करून देऊ शकलो असे विजय मांडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. पत्रकारिता करतांना विवेक बुद्धीने चालावे लागते असे प्रतिपादन दत्ता म्हात्रे यांनी व्यक्त केले. या परिसंवादाचे सुत्र संचलन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले.

सार्वजनिक ग्रंथालय -एक संस्था या विषयावरील परिसंवाद अरविंद गणपत वनगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या परिसंवादात रामदास गायकवाड, तुकाराम पवार, संजय कदम व संजय बोनदारडे यांनी सहभाग नोंदवला . या परिसंवादातुन ग्रंथालयीन कामकाजातील महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. ग्रंथालयीन कर्मचारी व संस्थेचे कार्यकारी मंडळ यांच्या समन्वयातून ग्रंथालय या संस्थेची प्रगती होवू शकते असे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले. २० व २१ मार्च असे दोन दिवस ग्रंथोत्सव – २०२४ साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यातील वाचकांनी ” ग्रंथप्रदर्शन व ग्रंथ विक्रीदालनास भेट देवून ग्रंथ.खरेदी केली.

ग्रंथोत्सव यशस्वीतेसाठी महात्मा गांधी वाचनालय, पेण‌च्या सर्व कर्मचारी व सदस्यांनी तसेच जिल्हा ग्रंथालययाच्या ममता रोगे यांनी परिश्रम घेतले.उत्कृष्ठ वाचकांचा सत्कारग्रंथोत्सव-२०२४ मध्ये या वर्षी प्रथमच रायगड जिल्ह‌यातील तालुका व जिल्हास्तरीय ग्रंथालयातील उत्कृष्ट वाचकांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. उरण येथील पाडूरंग कोळी (वय, वर्ष ८०) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. माँसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालय, नगरपरिषद, उरण या ग्रंथालयाचे ते आजही नियमीत वाचक आहेत. या वयातही पंधरा दिवसांनी ५ कि. मी. पायी चालत ग्रंथाल‌यात येवून ग्रंथ बदलून नेतात.

0000

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगर च्या वतीने महाप्रशिक्षण अभियान अंतर्गत निवासी प्रशिक्षण वर्ग संपन्न

vishwatmaklokswamivarta

अभिमानाचा क्षण! 🇮🇳बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान

ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांबाबत जागरूकता वाढवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ,जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीचा आढावा,बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे निर्देश..

समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा; समान हक्क व सन्मानावर भर

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता1 डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार  

vishwatmaklokswamivarta

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta