vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी माथाडी कामगार कायदा तसेच अन्य कामगार कल्याण कायदे व योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा व याबाबत दर आठवड्याला अहवाल सादर करा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या जिल्हास्तरीय कृती समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा कामगार अधिकारी सुरेंद्रसिंग राजपूत, वखर महामंडळाचे अंकुश भाटेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक के. एस. पवार, कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुभाष लोमटे, शेख हारुन, संतोष तळेकर आदी उपस्थित होते.

कामगारांची विविध आस्थापनांवर निवड होऊन त्यांच्या वेतनावरील लेव्ही कामगार मंडळाकडे वेळेत जमा न करणे, कामगारांच्या नियुक्त्यांसंदर्भात विविध प्रश्न, कामगारांना वेळेवर वेतन न दिल्यास दंड आकारणी करणे अशा विषयांबाबत चर्चा करण्यात आली. कामगार संघटनांनी यासंदर्भात त्यांचे प्रश्न मांडले.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, वखार महामंडळांनीही माथाडी कायद्याप्रमाणे काम करावे. कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन व अन्य लाभ मिळावे यासाठीच मंडळ आहे. कामगारांच्या हिताच्या कायद्याची अंमलबजावणी हेतूपुरस्कर न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा,असे निर्देश त्यांनी दिले. तसेच या कारवाई संदर्भात तसेच कामगारा संघटनांच्या विविध वैध मागण्यांबाबत सरकारी कामगार अधिकारी यांनी दर आठवड्याला अहवाल सादर करावा,असे निर्देशही दिले.

०००००

संबंधित पोस्ट

सन 2026-27 मधील नमुंमपा क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• आयुष्मान भारत कार्ड निर्माण व वितरण गतिमान करण्याच्या सूचना

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?

दुबईत युद्धजन्य तणाव; हजारो भारतीय अडचणीत – केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी : खासदार डॉ. कल्याण काळे

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta