vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ..

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ..

सातारा प्रतिनिधी: जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभासाठी दि. 17 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.

    योजनेचा लाभ घेणेकरीता इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष रुपये ४३ हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रूपये ३८ हजार या प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे. सदर योजनेंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या १५०, द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५०, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० अशा एकूण ६०० विद्यार्थ्यांची लाभाकरीता निवड केली जाणार आहे.

तरी सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी बी.ए/बी.कॉम/बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए./एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिक्षण घेणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना दि. 27 ऑगस्ट पर्यंत https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावी.

संबंधित पोस्ट

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

जपमाळ याविषयी काही महत्वपूर्ण माहिती

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरवदेशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार पुणे सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

सोयाबीन, कापूस, संत्राचे तत्काळ पंचनामे करावेत  – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय-देशातील रेल्वे स्थानकांवर चेहरा तपासणी यंत्रणा…

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन