vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दैनिक सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न ! ‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

दैनिक सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न !
‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

राज्य प्रतिनिधी‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे. गेल्या २५ वर्षांत ‘सनातन प्रभात’ने जे पाहिले, ते जगाला पहायला वेळ लागला. ‘हिंदु राष्ट्रा’सारखा विषय ‘सनातन प्रभात’ने आधीच हाताळलेला होता; पण जग आज हिंदु राष्ट्राविषयी सांगत आहे. मालेगाव बाँबस्फोटामागील सत्य हा विषयही ‘सनातन प्रभात’नेच प्रथम मांडला. काळाच्या पुढे जाऊन सूत्रे मांडण्यात ‘सनातन प्रभात’ अग्रेसर आहे. असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. २२ मार्च या दिवशी माटुंगा (प.) येथील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे ‘दैनिक सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘सनातन प्रभात’च्या ज्येष्ठ उपसंपादिका सौ. रुपाली अभय वर्तक यांनी सुद्धा यावेळी संबोधित केले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दिलेल्या शुभसंदेशाचे वाचन दैनिक ‘सनातन प्रभात’चे मुख्य वार्ताहर श्री. प्रीतम नाचणकर यांनी यावेळी केले. सनातन प्रभातच्या युट्यूब वाहिनीवरून या सोहळ्याचे ‘लाईव्ह प्रसारण’ करण्यात आले.

या कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रपठण आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाला. ‘दैनिक सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या अंकाचे प्रकाशन वक्त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ‘सनातन प्रभात’ची वैशिष्टये सांगणारा विडिओ दाखवण्यात आला. ‘सनातन प्रभात’च्या काही कृतिशील वाचकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ‘सनातन प्रभात’चे प्रदर्शन कक्ष, विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही याचा उपस्थितांनी लाभ घेतला.

‘सनातन प्रभात’चे नाव हिंदु राष्ट्र निर्मितीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल ! – सौ. रुपाली वर्तक, ज्येष्ठ उपसंपादिका, ‘सनातन प्रभात’

प्रचलित माध्यमक्षेत्रात कुठेही न आढळणारी अनेक वैशिष्ट्ये तत्त्वनिष्ठपणे जपत ‘सनातन प्रभात’ने आतापर्यंत अनेक राष्ट्र-धर्म विषयक दृष्टीकोन बीजरूपाने रुजवले आणि नंतरच्या काळात त्याचे चळवळी आणि आंदोलने यांच्या स्वरूपात परिवर्तन झाले. अतिशय परखड आणि निर्भीडपणे योग्य ते दृष्टीकोन देऊन ‘सनातन प्रभात’ सध्याच्या ‘डीप स्टेट’चे षड्यंत्र ध्वस्त करत आहे. हिंदु इकोसिस्टमचा भाग करून घेणार्‍या ‘सनातन प्रभात’चे नाव हिंदु राष्ट्र निर्मितीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल, यात शंकाच नाही. ‘दैनिक सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त सनातन प्रभातचे वाचक, वितरक, हितचिंतक, विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ आदी सर्वांप्रती कृतज्ञताभावाने आम्ही आभार व्यक्त करतो.
आपले नम्र,श्री. योगेश जलतारे
समूह संपादक, ‘सनातन प्रभात’
00000000

संबंधित पोस्ट

निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला

vishwatmaklokswamivarta

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय-मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता….

दि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पारितोषके

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याचे-जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन