vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा लक्षवेधी सूचना :बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

विधानसभा लक्षवेधी सूचना :बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

  राज्य प्रतिनिधी : बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ निलंबित करण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.  याबाबत सदस्य नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री आबिटकर म्हणाले, कोविड काळात झालेला भ्रष्टाचार हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही. या प्रकरणी सखोल चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

नीरा उजवा कालव्याच्या मजबुतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम

भव्य रक्तदान शिबीर व सत्संग सोहळा

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी* 

भारतीय नेमबाज अनिश भानवळा यांनी काहिरो, इजिप्त येथे झालेल्या ISSF वर्ल्ड शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. 🇮🇳🏆

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात– जिल्हाधिकारी किशन जावळे

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू