vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नेरुळ रुग्णालयातील कॅन्सर तपासणी कक्ष व आरोग्य सुविधांची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी

नेरुळ रुग्णालयातील कॅन्सर तपासणी कक्ष व आरोग्य सुविधांची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी

 

       नवी मुंबई प्रतिनिधी-  नागरिकांना महानगरपालिकेमार्फत उत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्याची बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे रुग्णालयीन सेवा सुविधांकडे बारकाईने लक्ष देत असून आज से.15, नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयास भेट देत त्यांनी तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. उध्दव खिल्लारे, कार्यकारी अभियंता श्री. उमेश पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

केसपेपर नोंदणीसाठी मोठया संख्येने नागरिक प्रतिक्षेत असल्याने त्यांच्याकरिता बैठक व्यवस्थेत वाढ करावी तसेच केस पेपरसाठी टोकन पध्दत प्रभावीपणे राबवावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. रुग्णालय इमारतीच्या आवारात एका बाजूला नागरिकांच्या वापरासाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी अशा सूचना त्यांनी केल्या. रुग्णालयात पुरविण्यात येणा-या सेवा – सुविधांचे व नागरिकांनी आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी याविषयीचे माहितीफलक बाहेरील बाजूस मोठया प्रमाणात लावून प्रभावी माहिती प्रसार यंत्रणा राबवावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

 तळमजल्यावर असलेल्या कॅन्सर तपासणी कक्षांची पाहणी करत, तेथील डॉक्टरांशी संवाद साधत अशा प्रकारची सुविधा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करुन दिली जात असल्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी याकरिता व्यापक प्रचार करावा, जेणेकरुन महिलांना त्याचा मोठया प्रमाणावर लाभ घेता येईल असे आयुक्तांनी सूचित केले.

त्याचप्रमाणे तेथील फलक प्राधान्याने मराठी भाषेत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. त्या ठिकाणच्या पाचही कॅन्सर तपासणी व उपचार कक्षांची रचना व मांडणी पाहताना बाहेरील बाजूस डिजीटल व फलक अशा दोन्ही प्रकारच्या मांडणीतून ऑडीओ – व्हिडीओ तसेच बॅनर्स व माहिती पुस्तिका, माहिती पत्रके या माध्यमातून माहिती प्रसार अधिक प्रभावी करावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या. त्यासोबतच कॅन्सर प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्याची पूर्वलक्षणे काय असतात याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी नागरिकांमध्ये माहिती प्रसारणासाठी विविध माध्यमांचा वापर करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले.

  कॅज्युल्टी कक्षाची पाहणी करतांना त्याठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या तसेच मॉड्युलर ओटीच्या कामाला वेग देऊन ते लवकरात लवकर वापरात आणण्यासाठी गतीमान कार्यवाही करावी असेही निर्देश देण्यात आले.

  केमोथेरपी डे केअर सेंटर, कॅन्सर वॉर्डच्या बाहेरही पूरक माहिती प्रसारण विविध माध्यमांचा वापर करून व्यापक प्रमाणात करावे तसेच डॉक्टर्स व नर्सेस यांना देण्यात येणा-या केमोथेरेपी विषयक प्रशिक्षणाची चाचणी टाटा सेंटरमार्फत घेण्याविषयी कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.

     मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळेची पाहणी करतांना विविध तपासण्यांची बारकाईने माहिती घेत आयुक्तांनी याठिकाणी ज्या वैद्यकिय चाचण्या केल्या जातात त्यांची माहिती नवी मुंबई व शेजारच्या शहरातील रुग्णालयांना द्यावी जेणेकरुन त्यांना आवश्यक असणा-या तपासण्या आपल्या प्रयोगशाळेतून केल्या जाऊ शकतात असेही आयुक्तांनी सूचित केले.सध्या हार्मोनल बदलांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असून त्याबाबत महानगरपालिकेमार्फत हार्मोनल स्टडी व आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करणारी आरोग्य सुविधा निर्माण करण्याबाबत शक्यता तपासून घ्याव्यात व त्याचा अहवाल सादर करावा असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.     आयुष बाह्यरुग्ण सेवा (OPD) कक्ष सुरु करण्याबाबत गतीमान कार्यवाही करावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.   नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणा-या आरोग्य सुविधा उत्तम रितीने पुरविण्यासोबतच त्यामध्ये सुधारणा करीत अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्यावर भर देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यावेळी दिले.

0000000

संबंधित पोस्ट

महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिक-केंद्रित सेवा आणि योजनांचा प्रचार करण्यासाठी एक विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून कार्यवाही– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

आज पाचवा दिवस पाचव्या दिवसाचे श्रीगणेश मूर्ती विसर्जन 🌸

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दि .4 जुलै रोजी मुंबईत**गेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्च**केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार*

vishwatmaklokswamivarta

घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन