vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

        सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लि. सांगली शाखा शिराळा येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आयोजित आर्थिक समावेशन अंतर्गत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा करण्यात आला.    या कार्यक्रमास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक अक्षय गोंडेवार, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी विश्वास वेताळ, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका विभागीय अधिकारी श्रीरंग शेळके, वसुली अधिकारी विश्वास जाधव, शाखाधिकारी अवधूत चव्हाण, बँक मुख्य कार्यालयाचे राकेश महाडिक उपस्थित होते.

      या मेळाव्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक अक्षय गोंडेवार यांनी रि-केवायसी, ग्राहकाच्या ठेवीचे संरक्षण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ग्राहकाप्रती असणारी धोरणे, डिजिटल फ्रॉड बाबत व जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी विश्वास वेताळ यांनी जन धन खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना व सायबर क्राईम विषयी महत्वपूर्ण माहिती उपस्थित ग्राहकांना दिली.

   ज्या ग्राहकांनी रि-केवायसी केलेली नाही त्यांनी बँकेशी संपर्क साधून आपल्या खात्याची रि-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन या मेळाव्यात मान्यवरांनी केले. उपस्थित ग्राहकांच्या शंकांचे निरसन अधिकाऱ्यांनी केले. प्रास्ताविक व आभार राकेश महाडिक यांनी मानले.

00000

संबंधित पोस्ट

उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत सात पर्यटनस्थळे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय, जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरु

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत

डाक विभागाच्या आउटलेटसाठी प्रस्ताव मागविले

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..

जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी-विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता…

जगात शांततेसाठीचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो – योगगुरू रामदेव बाबा