vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

मुंबई, प्रतिनिधी: एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर विराजमान होतो हे आपल्या संविधानाचे सामर्थ्य आहे, असे स्पष्ट करत विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा बनसोडे यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत सांगितले की, एक साधा कार्यकर्ता ते विधानसभेचा उपाध्यक्ष हा प्रवास प्रेरणादायी आहे. ते जनतेच्या विश्वासावर पुढे आले असून, त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला निश्चितच लाभ होईल.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे शासन सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या या सभागृहात सामान्य कार्यकर्त्याची उपाध्यक्षपदी निवड झाली याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. उपाध्यक्षपदावरून अण्णा बनसोडे सभागृहातील सदस्याच्या प्रश्नातून राज्यातील जनतेला न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे अभिनंदनपर भाषणात म्हणाले की, विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांच्या निवड प्रक्रियेत सर्वपक्षीय सहकार्याचे वातावरण दिसून आले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सकारात्मक भूमिका घेत बनसोडे यांच्या निवडीला पाठिंबा दर्शवला, याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचेही आभार मानले आणि उपाध्यक्षपदी विराजमान झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

000000

संबंधित पोस्ट

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

नमुंमपा पदभरती परीक्षेमध्ये दुस-या दिवशी 18442 उमेदवारांनी दिली परीक्षा…

आर्मेनियातील भारतीय दूतावास, टोवमास्यान फाउंडेशन आणि लुईसयोगा स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने #InternationalDayOfYoga2026 निमित्त १०८ सूर्यनमस्कारांच्या प्रेरणादायी सत्राचे आयोजन

गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले असून भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्री रामदास दौंड पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन दरबारी मान्य चे लेखी आश्वासन दिले,जालन्यात ब्राह्मण समाजाचे दीपक रणनवरे यांचे आमरण उपोषण मागे *भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीला यश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक

vishwatmaklokswamivarta

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; दरवाढ  लागू..

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’साठीप्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ..