vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा

 

राज्य प्रतिनिधी -प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा. केलेली कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) संबंधी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय प्रमुख यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते

प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा. केलेली कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

राज्य, जिल्हा परिषद व महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यान्वयीन यंत्रणांना निधी वितरण, वितरित निधीचा यंत्रणानिहाय खर्च आदिंचा तपशीलवार आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उर्वरित अल्प कालावधीत यंत्रणांनी आपल्याकडील 100 टक्के निधी खर्च करावा. जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करताना प्रशासकीय व आर्थिक शिस्त पाळावी. राज्य व स्थानिक स्तरीय यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी. विहित मुदतीत निधी खर्च करून राज्यात उत्तम स्थान पटकवावे, असे त्यांनी निर्देशित केले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी रस्त्यांची कामे, साकव यासारखी कामे दर्जेदार करावीत. काम सुरू करण्यापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅगिंग करावे, असे सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :ड्रग्ज प्रकरणात दोषी पोलिसांना बडतर्फ करणार- गृह राज्यमंत्री योगेश कदम

मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावर वाहतूक बंदी अधिसूचना जारी..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025**सभापती आरक्षण सोडतीसाठी*विशेष सभा आयोजित*

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल- उपमुख्यमंत्री अजित पवारश्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायन-पनवेल महामार्गावरीलठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न..