vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा  यास मद्रास उच्च न्यायालयाने  अंतरिम अटकपूर्व जामीन  मंजूर केला.

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा  यास मद्रास उच्च न्यायालयाने  अंतरिम अटकपूर्व जामीन  मंजूर केला….

 

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्याबद्दल कामरा यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी  कामरा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यास चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आले आहे. दरम्यान, त्याने अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज मंजूर करण्यात आला आहे

स्टँड-अप कॉमेडियन  कुणाल कामरा   मद्रास उच्च न्यायालयाने  अंतरिम अटकपूर्व जामीन शुक्रवारी (28 मार्च) मंजूर केला. मुंबई येथे चित्रित झालेल्या आणि युट्युब या मंचावरुन प्रसारित कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्याबद्दल कुणाल कामरा यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

 कुणाल न, अटकपूर्व जामीन मागताना मद्रास उच्च न्यायालयात माहिती दिली की, तो 2021 मध्ये मुंबई येथून तामिळनाला स्थलांतरित झाला आहे आणि तेव्हापासून ते तिथेच राहत आहे. मुंबई पोलिसांकडून होणाऱ्या कथीत अटकेबद्दल चिंता वाटत असल्याने आपण अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करत असल्याचेही कामरा यानने कोर्टात म्हटल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर, खार पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली कामरा यांच्यावर गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिसांनी दुसरे समन्स गुरुवारी जारी केले आणि कामरा यास या प्रकरणासंदर्भात 31 मार्च रोजी त्यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.

संबंधित पोस्ट

जर जरी बक्ष उरूस यात्रोत्सव भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या– जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडु महाप्रसाद वाटप समितीची निवड

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

14 जानेवारी रोजी कोकण विभागीय-पेन्शन अदालत

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक संपन्न