vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात काय म्हणाले ते पहा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात काय म्हणाले ते पहा…

मुंबई प्रतिनिधी-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात काय म्हणाले ते पहा त्यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे- थोडक्यात

राज्यातील नद्यांची मरणा अवस्थेतील स्थिती बद्दल त्यांनी विविध मुद्दे मांडले आणि अनेक विषय यांच्यावर बोलताना ते म्हणाले की

कुंभमेळ्यातील गंगेच्या स्थितीपासून राज्यातील 55 नदीपट्टे प्रदूषित असल्याचं सांगत मुंबईत 4 नद्या ‘वारल्या’ नव्हे मारल्या. एक मिठी नदी मरणासन्न अवस्थेत आहे. असं म्हणत राज ठाकरेंनी नद्यांवर बोललो की धर्म आडवा येणार ? असा संतप्त सवाल केला.

 औरंगजेब महाराष्ट्रात का थांबला होता? कारण त्याला येथील विचार मारायचा होता. आम्हाला मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेबाला येथे मारला होता हे लोकांना दिसायला हवे. येथील औरंगजेबाची कबर आहे तिचे डिझाईन काढून टाका ती कबर उघडी ठेवा ती लोकांनी पाहायला हवी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले. एवढ्या साम्राज्याचा बादशाहा केवळ अडीच तीन जिल्ह्याच्या राजाला संपवायला कसा आला याचा विचार करा असेही आवाहन राज ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे म्हणाले, ‘मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसांना आमचा पाठींबा असेल. निवडणुका संपल्या, शिमगा संपला. फडणवीसांच्या हाती सुसंस्कृत राज्य आलं आहे. चांगला कामाला आमचा निश्चित पाठींबा असेल पण प्रत्येक गोष्ट आमचं ऐकुन करा.’

राज ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून सर्वाधिक मराठा मंत्री, मराठा आमदार निवडून आले आहेत. मराठा मुख्यमंत्री होते तरी देखील माझ्या मराठा समाजाला आरक्षण मागावं लागत आहे. तुम्ही येवढ्या वर्ष काय केलं?

आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की उडवली पाहिजे. चित्रपटानं जागे होणारे हिंदू काय कामाचे नाहीत, चित्रपट थिएटरमधून उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता विकी कौशल मेल्यावर कळलं? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला. व्हाटसअपवर इतिहास वाचता येत नाही. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोकं घालावं लागेल. आता कुणीपण बोलायला लागलेत विधानसभेत बोलत आहेत, खरंतर काही काम नाही, औरंगजेबावर बोलतात. माहिती आहे तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं, यावेळी

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नोव्हेंबर पर्यंत होण्याची शक्यता यावेळी त्यांनी वर्तवली आहेत परंतु वेळ काळ ठरलेला नाही असे ते म्हणाले

संबंधित पोस्ट

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे• औसा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन; ग्रंथप्रेमींचा मोठा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर आणि उपनगरात तील काही विभागामध्ये मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दहा टक्के पाणी कपात- मुंबई महानगरपालिका

मेघालयातील लैतल्यंगकोट गावाजवळ शिलाँग–डावकी मार्गावर मोठी भूस्खलनाची घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद

अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध