vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

 

मुंबई, प्रतिनिधी: राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याच्या खरेदी विक्रीवर बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून कडक कारवाई करण्यात येते. तसेच या प्रकरणी दंडात्मक कारवाईची तरतुदही करण्यात आली आहे.

पारंपरिक माच्छिमारांच्या हिताचे संरक्षण आणि शाश्वत मासेमारीसाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने 58 प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानाबाबत शिफारस केली आहे. त्याप्रमाणे लहान आकाराचे मासे पकडणे टाळण्यासाठी कोवळ्या माशांची मासेमारी करण्यावर कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या 2 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आदेशाने 54 प्रजातीच्या किमान कायदेशीर आकारमानाचे विनियमन करण्यात आले आहे.

 महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 (सुधारीत – 2021) कलम 17(8)(अ) व (ब) नुसार लहान आकाराच्या माशांची मासेमारी बंदीच्या उल्लंघनासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच याविषयी जनजागृती करण्यासाठी मासळी बाजारांमध्ये फलकही लावण्यात येणार आहेत.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा दक्षता समिती बैठकसंविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद कामकाज :राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी- उद्योग मंत्री उदय सामंत

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होणाऱ्या मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टोरंटस आणि बार इत्यादी आस्थापनांमध्ये आगीपासून बचावासाठी पुरेशा उपाययोजना आहेत किंवा नाहीत याची तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबवत आहे

vishwatmaklokswamivarta

पुनर्वसनाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत‍ छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले…