vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पैठण तालुक्यातील शेतरस्त्यांच्या प्रकरणांची दि.७,१५ व २१ रोजी सुनावणी…

पैठण तालुक्यातील शेतरस्त्यांच्या प्रकरणांची दि.७,१५ व २१ रोजी सुनावणी…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- पैठण तालुक्यातील शेतरस्त्याच्या प्रकरणांची अंतिम सुनावणी सोमवार दि.७, मंगळवार दि.१५ व सोमवार दि.२१ रोजी दुपारी २ वाजता पैठण तहसील कार्यालयात होणार आहे,असे पैठणच्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांनी कळविले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत दाखल झालेल्या रस्ता प्रकरणांवर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्ययोजनेंतर्गत नागरी सुविधा सुधारण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे. विशेषतः, शेतकऱ्यांना शेतीकामासाठी रस्त्यांची नितांत गरज असते. त्यामुळे शेती हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी रस्त्यांची सोय व्हावी, यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. जून महिन्यात शेती मशागतीच्या कामाकरीता शेतकऱ्यांना रस्त्याची आवश्यकता असल्याने दाखल रस्ता प्रकरणात जलद गतीने सुनावणी घेऊन रस्ताचे प्रकरण त्वरीत निकाली काढण्याकरीता रस्ता प्रकरणात तहसिल कार्यालय पैठण येथे दि.७, दि.१५ एप्रिल व अंतिम सुनावणी दि.२१ एप्रिल रोजी दुपारी २ वा. रोजी घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करणे, उपलब्ध करुण देणे ही त्यांच्या जिव्हाळयाची बाब असल्यामुळे ही प्रकरणे मोहिम स्वरुपात निकाली काढण्यात येणार आहे, याची संबंधित शेतकरी तसेच संबंधित प्रकरणातील वकिलांनी नोंद घ्यावी, असे पैठणच्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांनी कळविले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-जलवाहिनी बदलण्याच्या प्रस्तावास पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी प्राप्त

vishwatmaklokswamivarta

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने विकास कामे करावीत- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

जालना-नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांच्या समृध्दी महामार्गाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

नायगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत सिरसाठ दाम्पत्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप**’पे बॅक टू सोसायटी’ भावनेतून सामाजिक बांधिलकी; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*