vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवउद्योगांना मंजुरी देण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात चौथा तर अमरावती विभागात पहिला!Ø मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ; ३३० नवउद्योजकांनी उभारले उद्योग..

नवउद्योगांना मंजुरी देण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात चौथा तर अमरावती विभागात पहिला!Ø मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ; ३३० नवउद्योजकांनी उभारले उद्योग..

बुलढाणा, प्रतिनिधी: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथं स्थान पटकावलं आहे. मागच्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार, बुलढाणा जिल्ह्याने १२१.९८ टक्के नवउद्योजकांच्या प्रस्तावांना मंजुरी देत उद्दिष्टपूर्ती साधली आहे. यासोबतच अमरावती विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांनी उद्दिष्टापेक्षा अर्थात १०० टक्क्यांहून अधिक प्रस्तावांना मंजुरी देणारा अमरावती विभाग बनला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार अमरावती विभागांतर्गत बुलढाणा जिल्ह्यासाठी ६७८, अमरावती ८४५, अकोला ८४८, वाशिम ५१८ आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ६०२ उद्योग प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते.

सन २०२४-२५ या एका वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात ३,७८६ नवउद्योजकांच्या प्रस्तानवांना मंजुरी देण्यात आली आहे. यात बुलढाणा जिल्हा ८२७ उद्योगांना मंजुरी देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

जिल्हा,उद्दिष्ट मंजूर टक्केवारी बुलढाणा ६७८ ८२७,१२१.९८%अमराव८४५,९१०,१०७.६९%

अकोला,८४८,८९९,१०६.०१%वाशिम५१८,५३९१०४.०५%यवतमाळ ६०२,६११,१०१.५०% मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला ५० लाख रुपये, तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला कर्ज रकमेच्या १५ ते २५ टक्के, तर विशेष प्रवर्ग, एससी, एसटी, अपंग, माजी सैनिक, ओबीसी व अल्पसंख्यांकांना २५ ते ३५ टक्के अनुदान दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतर संबंधित प्रकरण बँकेकडे जाते. बँकेने कर्ज प्रकरणाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात अनुदान जमा होते.

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ८०० लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा उद्योग केंद्राने ८३० जणांना लाभ देत १०४ टक्के इतके उद्दिष्ट गाठले आहे. यात गारमेंटमध्ये सर्वाधिक १३६, अन्न प्रक्रिया १४८, ब्युटीमध्ये ७०, फॅशन डिझायनिंगमध्ये १६, ट्रान्सपोर्टमध्ये ३० इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनीअरींग १०० व इतर ३३० असे उद्योग उभारले आहेत.

संबंधित पोस्ट

सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

आनंदनगर येथील अजंता बुध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले तर सचिव पदी विकी साबळे यांची निवड…

विशेष वृत्त-राज्यात आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी शेख महेमूद यांंची निवडअरविंद अण्णा चव्हाण यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार