vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महावीर जयंतीला कत्तलखाने, मांसविक्री बंद

महावीर जयंतीला कत्तलखाने, मांसविक्री बंद

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यात गुरुवार, दि. 10 एप्रिल रोजी महावीर जयंती तसेच शनिवार दि. 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्ताने कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. निर्बंधाच्या कालावधीत मांसविक्री होणार नाही, याची दक्षता देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

 जैन धर्मियांच्या वतीने महावीर जयंती तसेच हनुमान जयंतीनिमित्त उत्सव मिरवणूक काढण्यात येतात. सध्या विविध राजकीय पक्ष संघटनांकडून सुरु असलेली आंदोलने, औरंगजेबाची कबर काढण्याच्या कारणावरुन नागपूर येथे उद्भवलेली जातीय दंगलीची पार्श्वभूमी, राज्यातील राजकीय घडामोडी व त्यांच्याकडून विविध मागण्या संदर्भात होणारे आंदोलने, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी, तसेच उत्सवाचा मागील इतिहास लक्षात घेता या उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दक्षता बाळगणे आणि खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणून चोख बंदोबस्त नेमणे आवश्यक असल्याने उत्सवाचे काळात दि. 10 एप्रिल 2024 रोजी श्री महावीर जयंती उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवावीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

000000

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; एकदा जमीन विकली काय म्हणाले राज ठाकरे? भाषा संपली तर… रायगडवासियांना राज ठाकरेंचं आवाहन

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन· पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा..

vishwatmaklokswamivarta

*सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन*

कोजागिरी पोर्णिमा माहिती -, इतिहास आणि कथा शरद पोर्णिमा माता शबरी जन्मतिथी

अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न