vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

            मुंबई, प्रतिनिधी : ठाणे पोलीस दलाकडून हुक्का पार्लरच्या आड चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येत आहे. ठाणे पोलीस दल गोपनीय छापे, गुन्हे दाखल करणे, परवाने तपासणे अशा अनेक स्तरांवर कारवाई करीत आहे. ठाणे शहरामध्ये जाने २०२५ ते अद्यापपर्यंत एकूण ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापे टाकून संबधितांवर कोटपा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

   ठाणे शहरामध्ये तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मॉल्स, कॅफे आणि हँग आऊट्स येथे विशेष गस्त व गुप्त तपासणी सुरू आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस दलाने अशा बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘ झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबिले आहे. पुढील काळातही अशा हुक्का पार्लरच्या आड सुरू असणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याची मोहिम अधिक गतीने राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

नव्या भारताचे नवे कायदे-भारतीय न्याय संहिता २०२३’’ या विषयावरील मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन आज पासूनप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते उदघाटन..

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

जिल्ह्यातील धरणात 152.78 दलघमी पाणीसाठा- पाच तालुक्यात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा- जिल्हा व तालुका प्रशासनाच्या उपाययोजना सुरु- पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ११७ कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन