vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील धरणात 152.78 दलघमी पाणीसाठा- पाच तालुक्यात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा- जिल्हा व तालुका प्रशासनाच्या उपाययोजना सुरु- पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातील धरणात 152.78 दलघमी पाणीसाठा- पाच तालुक्यात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा- जिल्हा व तालुका प्रशासनाच्या उपाययोजना सुरु- पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी: पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये आज रोजी 152.786 दलघमी (32.65 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या असून त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 17 गावांमध्ये 19 खाजगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी या तीन मोठ्या प्रकल्पामध्ये 71.662 दलघमी(32.18 टक्के) तर ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पामध्ये 53.680 दलघमी (37.89 टक्के) व 41 लघु प्रकल्पामध्ये 27.444 दलघमी (26.49 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे.

जलाशय पातळी अहवालानुसार मोठ्या प्रकल्पांतर्गत नळगंगा प्रकल्पामध्ये 35.32 दलघमी(51 टक्के), खडकपूर्णा प्रकल्पामध्ये 8.32 दलघमी (9 टक्के), पेनटाकळी प्रकल्पामध्ये 28.02 दलघमी(47 टक्के) या तीन मोठ्या प्रकल्पामध्ये एकूण 71.662 दलघमी (32.18 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे.

तर मध्यम प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये 22.05 दलघमी(65 टक्के), मस प्रकल्पामध्ये 5.24 दलघमी (35 टक्के), कोराडी प्रकल्पामध्ये 3.69 दलघमी (24.40 टक्के), पलढग प्रकल्पामध्ये 1.24 दलघमी (17 टक्के), मन प्रकल्पामध्ये 14.36 दलघमी (39 टक्के), तोरणा प्रकल्पामध्ये 0.75 दलघमी (10 टक्के), उतावळी प्रकल्पामध्ये 6.35 दलघमी (32 टक्के) असे एकूण सात मध्यम प्रकल्पामध्ये 53.68 दलघमी (37.89 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे. तसेच एकूण 41 लघु प्रकल्पामध्ये 27.444 दलघमी (26.49 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे.

> पाच तालुक्यात 19 टँकरने पाणी पुरवठापाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 17 गावांसाठी 19 टँकर पाणी पुरवठ्याकरिता मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील 6, बुलढाणा येथे 5, चिखली येथे 3, सिंदखेड राजा येथे 1 अशा 15 गावांसाठी प्रत्येकी एक टँकर तर देऊळगावा राजा येथील 2 गावांसाठी 4 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

टँकरने होणारा पाणीपुरवठा याप्रमाणे: मेहकर तालुक्यातील पारडी, जवळा, हिवरा साबळे, वरवंड, बोथा व पाथर्डी या गावांसाठी प्रत्येकी एक टँकर. बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई, सैलानी, ढासाळवाडी, पिंपरखेड व चौथा गावांसाठी प्रत्येकी एक टँकर, चिखली तालुक्यातील कोलारा,श्रीकृष्णनगर व भालगाव येथे प्रत्येकी एक टँकर, सिंदखेड राजा तालुक्यातील सारगाव माळ येथे एक टँकर. तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे तीन टँकर तर निमखेड येथे एक टँकरव्दारे दररोज पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

शहरी व ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना सुरु – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

“उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांना पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तीव्र पाणीटंचाई भागांमध्ये खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली जात आहे. ग्रामीण भागातील १०८ गावात ११८ विहिरी अधिग्रहण करून पाणी पुरवठा देखील केला जात आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी जपून पाणी वापरावे आणि त्याचा अपव्यय टाळावा. प्रशासन आपल्या स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे,” असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरा दर्शन केले

vishwatmaklokswamivarta

२०२४ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान

vishwatmaklokswamivarta

शहीद जवानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

केस गळती आजाराच्या संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ येणार – प्रतापराव जाधव > केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली बाधित गावांना भेट > घाबरु नका, लवकरच निदान 

vishwatmaklokswamivarta

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी..बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे- विभागीय आयुक्त पी. वेलरासू

पालघरकर महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना विक्रमी मताने विजयी करतील हा ठाम विश्वास… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती च्या भव्य प्रचार सभेत व्यक्त केला

vishwatmaklokswamivarta