vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

 

रायगड( प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शनिवार दि. 12 एप्रिल 2025 रोजी रायगड किल्ल्यावर सकाळी 11.00 वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहॆ. यामध्ये राजदरबारात श्री शिवप्रतिमा पूजन, सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे सन्मान, गडरोहण स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा, श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार वितरण, शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री. अमित शाह हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास अनेक मंत्री, खासदार व आमदार उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री श्री शहा सकाळी 11 वा रायगड येथे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात श्री शिवपुष्पस्मृती रायगड पुरस्कार दुर्ग अभ्यासक निलकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सैन्यदल अधिकारी ले.जन. संजय कुलकर्णी यांचा सन्मान व सरदार घराणे सन्मान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंगजी होळकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

००००००

संबंधित पोस्ट

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचा जिल्हा दौरा…

जालना येथे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

कृपया प्रसिद्धीसाठी !महाराष्ट्र मंदिर महासंघामुळे कोट्यवधीची मंदिराची जमीन बिल्डर लॉबीच्या घशात जाण्यापासून वाचली सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन अवघ्या९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश अखेर रद्द!* उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर आदेश अखेर रद्द !* अमरावतीतील ऐतिहासिक सोमेश्वर महादेव देवस्थानची मालकी अबाधित !

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शनिवारी (दि.३१) बाईक रॅली