vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या आयोजन..

मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या आयोजन..

मुंबई प्रतिनिधी -मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे पत्रकार परिषद पार पडली.

 ‘वेव्हज २०२५’ च्या निमित्ताने क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा इव्हेंट होणार आहे. जागतिक दर्जाच्या या परिषद आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला असून यामुळे जगातील ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट’ क्षेत्र मुंबईकडे आकर्षित होणार आहे. यामुळे भविष्यात ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमी’चे नेतृत्व भारत करेल, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाची मालाडला २४० एकर जागा आहे. या जागेवर जागतिक दर्जाच्या एंटरटेनमेंट हबची व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे जगातील करमणूक क्षेत्रातील नामवंत मुंबईकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर आयआयसीटी म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजी नावाची संस्था मुंबईला दिली आहे. ही महत्त्वाची संस्था मुंबईत असल्याने या क्षेत्रात मुंबई जगाच्या एक पाऊल पुढे असणार आहे. करमणूक क्षेत्राची मुंबई ही जगाची राजधानी असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयआयसीटीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.

संबंधित पोस्ट

आज मध्य महाराष्ट्र, उत्तर अंतर्गत कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता …

vishwatmaklokswamivarta

जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांवर भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्याचे आवाहन- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

आज पासून नवरात्र उत्सव आरंभ नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे १० दिवसांचे

vishwatmaklokswamivarta

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म,विधानपरिषदेतील अभिनंदन ठरावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर