vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट

जालना, (प्रतिनिधी)- सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस pउन्हाची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होत आहे.अनेक तांडे, वस्त्या व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. याठिकाणी तात्काळ टँकर सुरू करावेत. जेणेकरून सामान्य नागरिकास त्याचा दिलासा मिळेल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनियार यांना दिलेल्यानिवेदनात म्हटले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या

शिष्टमंडळाने शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले व जिल्हाप्रमुख भास्कररावअंबेकर यांच्या नेतृत्वात नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी जगदीश मिनियार यांची भेट घेतली. जालना जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजू झालेले मुख्यकार्यकारी अधिकारी जगदीश मिनीयार यांचे शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच जालना जिल्ह्यातील पाणी टंचाईसह इतरही समस्या मांडून जिल्ह्यातीलएकूण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.यावेळी जिल्हासंघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम,मुरलीधर शेजुळ, बाबुरावपवार, रमेश गव्हाड, मनीश श्रीवास्तव, मुरलीआबा थेटे, तालुका प्रमुख हरिहरशिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरयांनी म्हटले की, अनेक गावांना जोडणारे ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झालेले आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. जिल्ह्यातीलअनेक गावातील आरोग्य केंद्रांना कर्मचारी वर्ग व औषधांचा साठा पुरेशाप्रमाणात नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊन आर्थिक भुर्दंड सहनकरावा लागतो. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या अनेक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याने अनेक कामगार व मजुरांची हेहेळसांड होते. तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आलेले आहेत.त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. तर अनेक शाळांना नवीन वर्ग खोल्या वइमारतीची गरज आहे. त्यांना त्या बांधून देण्यात याव्यात पुरेशा प्रमाणातशिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत जेणेकरून ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांना विनाकारण शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही.अशा अनेक मागण्या शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी मिनियार यांच्याकडे करण्यात आल्या. यासर्वच मागण्यांना मुख्यकार्यकारी अधिकारीमिनियार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी कुंडलिक मुठ्ठे, प्रभाकरउगले, अशोकराव हांडे, रामजी गायकवाड, शंकर जाधव, विठ्ठल पडूळ यांच्यासहअनेकांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

२०३४च्या फुटबॉल विश्वचषकासाठी ‘प्रोजेक्ट महादेवा’ मधून गुणवान खेळाडू मिळतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा’चा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआइडी व आधार कार्ड ३१ मार्चपूर्वी जमा करावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ॲडव्हान्टेज महा.एक्स्पो-२०२६ च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

ऐरोली विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या मॅपिंगसाठी विशेष मोहीम; २००२ च्या मतदार यादीशी होणार पडताळणी*

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी  आरक्षण जाहीर

vishwatmaklokswamivarta

मातृभाषेतून शिक्षणामुळे शब्दसंग्रह, ज्ञानसंपदेत वाढ- शाहीर पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

vishwatmaklokswamivarta