vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आरोग्य अधिकाऱ्यांना सीपीआर प्रशिक्षण; ठाणे जिल्ह्यात हृदयविकारग्रस्तांना जीवनदान देण्याचा संकल्प…

आरोग्य अधिकाऱ्यांना सीपीआर प्रशिक्षण; ठाणे जिल्ह्यात हृदयविकारग्रस्तांना जीवनदान देण्याचा संकल्प…

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – सद्यस्थितीत वाढत्या हृदयविकाराच्या घटनांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक हृदयक्रिया बंद झाल्यास रुग्णाला तत्काळ CPR (Cardio Pulmonary Resuscitation) मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. हाच महत्वाचा उद्देश समोर ठेवून ठाणे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने CPR प्रशिक्षण मोहीम राबवली जात आहे.

      ही मोहीम आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे

प्रशिक्षणाचे टप्पे:

टप्पा 1:-7 एप्रिल 2025 रोजी मा. आरोग्यमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि इतर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर यांच्या मार्फत दृकश्राव्य माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.

टप्पा 2:-8 एप्रिल 2025 रोजी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

टप्पा 3:-तालुका स्तरावरील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

टप्पा 4:-प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आशा व अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण दिलं जाईल

टप्पा 5:-प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थ्यांना CPR चे प्रशिक्षण देतील.

टप्पा 6:-VHNSC सदस्य, जन आरोग्य समिती सदस्य आणि सामान्य नागरिकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.      या उपक्रमाच्या माध्यमातून हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी करणे आणि आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मदतीचा हात देणे हा उद्देश आहे.

000

संबंधित पोस्ट

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी· ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासण्या

vishwatmaklokswamivarta

कामोठे येथे जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम संपन्न

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आयुष्यमान कार्ड व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज * २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम * कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ग्रामपातळीवर नियोजन

ठाणे जिल्ह्यात कर्करोग निदानासाठी फिरती कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta