vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतीय जनता पार्टी जालना महानगर चार मंडळाच्या नियुक्त्या जाहीर!सुनील खरे, संजय डोंगरे, महेश निकम, अमोल धानुरे यांचा समावेश विकास कामे शहरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवा – भास्कर आबा दानवे

भारतीय जनता पार्टी जालना महानगर चार मंडळाच्या नियुक्त्या जाहीर!सुनील खरे, संजय डोंगरे, महेश निकम, अमोल धानुरे यांचा समावेश विकास कामे शहरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवा – भास्कर आबा दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हा अंतर्गत चार मंडळाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यात महानगर ग्रामीण मंडळ अध्यक्ष पदी श्री.संजय डोंगरे, नवीन जालना मंडळ अध्यक्ष श्री.सुनील खरे, जुना जालना मंडळ अध्यक्ष श्री.महेश निकम, पूर्व जालना मंडळ अध्यक्ष श्री.अमोल धानुरे यांचा समावेश आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हा कार्यालयात रविवारी (ता.२०) जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे यांच्या हस्ते नवनियुक्त मंडळ अध्यक्षांना नियुक्ती पत्रे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश निमंत्रित सदस्य विजय कामड, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्याताई देठे, महानगर अध्यक्ष सतीश जाधव, अर्जुन गेही, डॉ.श्रीमंत मिसाळ, प्रा.राजेंद्र भोसले, वसंतराव शिंदे, सौ.अरुणाताई जाधव, विष्णू डोंगरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना श्री.भास्करराव पाटील दानवे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा शहरातील नागरिकांपर्यंत पोहचवून आपल्या मंडळात पक्ष संघटन बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले.महानगर अध्यक्ष सतीश जाधव यांनी भारतीय जनता पार्टीचे काम जालना शहरातील प्रत्येक वार्डात पोहोचवून जालना महानगरपालिकेवर भाजपा महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र भोसले यांनी केले तर वसंत शिंदे यांनी आभार मानले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान निवडीची घोषणा होताच पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन मंडळ अध्यक्ष निवडीचा जल्लोष साजरा केला.बाबासाहेब पाटील कोलतेप्रसिद्धीप्रमुख, भाजपा जि.जालना यांची माहिती९८६०७०७५००

संबंधित पोस्ट

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

vishwatmaklokswamivarta

नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त-ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

व्यवसायातील समस्या व कराच्या बोजावर गंभीर चर्चामराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या संचालक मंडळाची बैठक