vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिनाची पूर्व तयारी आढावा बैठक…

महाराष्ट्र दिनाची पूर्व तयारी आढावा बैठक…

 

नवी मुंबई, प्रतिनिधी:- 1 मे, महाराष्ट्र स्थापना दिनाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक अपर आयुक्त  (सामान्य प्रशासन) राजलक्ष्मी शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

कोकण भवनातील पहिला मजला समिती सभागृह येथे झालेल्या या बैठकीत कोकण विभागातील विविध कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त विभागीय स्तरावरील मुख्य शासकीय ध्वजारोहण दि. 1 मे, 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता कळंबोली सेक्टर-17 येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार असून. त्या अनुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमती शहा यांनी कोकण भवनातील सर्व शासकीय यंत्रणांनी हा सोहळा शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन यशस्वीरित्या साजरा करण्याबाबत सूचना दिल्या.  प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे सांगून सर्वांनी शासकीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे  ही त्यांनी यावेळी सांगितले.

000 000

संबंधित पोस्ट

गणपती पुळे येथील दुर्घटनेतील मयतांच्या वारसांचा मदत वाटप

जालना महानगरपालिका कार्यालयातील मा. महापौर यांच्या दालनात दोन नगरसेवकांमध्ये झालेल्या गंभीर मारहाण व हाणामारीच्या घटनेबाबत जालना जिल्ह्याचे खासदार यांनी पोलीस अधीक्षक, जालना यांना निवेदन दिले

कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल ‘दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्षमता उलगडणे’ या विषयावर प्री-समिट राऊंडटेबलचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करूनदेण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम महत्त्वपूर्ण- मंत्री आदिती तटकरे• सचिवालय जिमखाना येथे ‘शक्ती ऑन व्हील्स’ प्रदर्शनी व विक्री व्हॅनचे उद्घाटन• नोकरदार महिलांना दर्जेदार खाद्यपदार्थ व घरगुती वस्तू सहज उपलब्ध होणार

बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्य; स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta