vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल आज उरणमध्ये**नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे*

*”ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल आज उरणमध्ये**नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे*

 

रायगड प्रतिनिधी: केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले आहे.नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहॆ.

या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल.

उरण शहरातील खालील सात ठिकाणी सायरन बसविण्यात आले आहेत. तहसिल कार्यालय, उरण, ONGC कॉलनी,ग्रुप ग्रामपंचायत, चाणजे, GTPS कंपनी, बोकडविरा, बारमर लॉरी, भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी, कोप्रोली, बल्क गेट कंपनी, मोरा या दरम्यान एन.आय. स्कूल, पंचायत समिती, उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल होणार असून, नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सायंकाळी उरण शहरातील काही भागांमध्ये ५ मिनिटांसाठी ब्लॅकआउट (प्रकाशव्यवस्था बंद) करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे.

जिल्ह्यात इतर कोणत्याही ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

संबंधित पोस्ट

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*

कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकविद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस,सीसीटीव्ही कॅमेरे,पॅनिक बटन सुविधा बंधनकारक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु….