vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार

मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार

मुंबई प्रतिनिधी –

मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

vishwatmaklokswamivarta

सेवाकार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

जिल्हा महिला, बाल विकास सनियंत्रण समिती बैठकबालकामगार ,बालभिक्षेकरी व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून  गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन-निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल -मुख्यमंत्री