vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलबिंत मागण्यांबाबत थेट संवाद”संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत आठही जिल्ह्यातील दिव्यांगांनी मांडल्या अडचणी…

विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलबिंत मागण्यांबाबत थेट संवाद”संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत आठही जिल्ह्यातील दिव्यांगांनी मांडल्या अडचणी…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग यांच्या प्रलबिंत अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी, दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य देत अडचणी तत्परतेने सोडवा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त श्री. दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून “संवाद मराठवाड्याशी” वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये विभागीय आयुक्त श्री.दिलीप गावडे, यांनी विभागातील दिव्यांगांच्या अडचणी, मागण्या या विषयावर विभागातील दिव्यांगांशी थेट संवाद साधला. यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा,सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त राजेंद्र अहिरे, राम लाहोटी आदी उपस्थित होते

छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यातील दिव्यांग यांनी त्यांच्या आजपर्यंत प्रलबिंत असलेल्या मागण्यांबाबत माहिती दिली.अर्थसंकल्पित निधी निश्चित केलेल्या विविध विभागातून आर्थिक वर्षात खर्च करावा. दिव्यांगांच्या असलेल्या विविध समस्या व त्या अनुषंगाने उपाययोजना, राज्य शासनाचे शासन निर्णय, कायदा व विभागीय तरतूदी, दिव्यांग यांच्या नोकरीतील विविध अडचणी सुटण्यास गती द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी उपस्थित दिव्यांगाच्या जिल्हानिहाय समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्य़ातील निवासी उपजिल्हाधिकारी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, नगर पालिका मुख्याधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांनी दिव्यांगासाठी करावयाच्या पाच टक्के निधीतून शासन निर्णयानुसार सामुहिक व वैयक्तिक स्वरूपाच्या योजना वर खर्च करावा. दिव्यांग कर्मचारी यांच्या चार टक्के आरक्षण, पदभरती व पदोन्नती बाबतीत योग्य ती कारवाई करावी, अशा सुचना विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिल्या.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

******

संबंधित पोस्ट

पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिल्यामुळे भारताच्या दळणवळण खर्चात मोठी कपात झाली आहे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठा निधी, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना मिळाली गती

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026” चा समारोप

व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगची जिल्हा कार्यकारिणी जाहीर..कार्याध्यक्ष गणेश सोळंकी तर सचिव पदी गणेश सवडतकर यांची नियुक्ती..

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात; नागरिकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील· विविध कार्यक्रमांचे आयोजन· उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव होणार· लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व अनुदान वाटप होणार

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे ३० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे लोकार्पण